कामशेत - सह्याद्री प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील किल्ले तुंगनंतर किल्ले तिकोना ऊर्फ वितंडगडालाही सागवानी दरवाजा बसविण्यात आला. या दरवाजाचा लोकार्पण सोहळा सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार व रवींद्र भेगडे यांच्या हस्ते झाले.सह्याद्री प्रतिष्ठानाच्या माध्यमातून लोकवर्गणीतून निधी जमा करून या दरवाजाची उभारणी करण्यात आली. रविवारी गडाच्या पायथ्याला ग्रामदेवताचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ढोल-ताशाच्या गजरात व शिवघोषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान गडावर झाले. मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र (आप्पा) भेगडे यांच्या हस्ते गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरामध्ये अभिषेक करून शस्त्रपूजन करण्यात आले. बालेकिल्ल्यावर शाहीर वैभव घरत व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहिरी सादर केली. तर प्रा. डॉ. प्रमोद बोºहाडे यांनी तिकोना ऊर्फ वितंडगडाच्या इतिहासाला उजाळा दिला.मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपणाºया वास्तूंचे जतन होणे गरजेचे आहे. आपले गडकिल्ले शाबूत राहण्यासाठी सर्व स्तरांवरून मावळवासीयांनी प्रयत्न करावेत आणि स्थानिकांसह युवकांनी गडकिल्ले सुरक्षित करण्याचे आवाहन रवींद्र भेगडे यांनी केले, तर सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांनी गड-किल्ले यांच्या संवर्धनासाठी झटणाºया हातांचे व संस्थांचे कौतुक केले.या वेळी सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, याज्ञसेनीराजे दाभाडे सरकार, मावळ प्रबोधिनीचे संस्थापक रवींद्र भेगडे, अभिनेत्री शीतल ठेकळे, तळेगावचे नगरसेवक अमोल शेटे, विनीत भेगडे, नितीन घोटकुले, संदेश भेगडे, दत्तात्रय शेवाळे, कुणाल साठे, भास्कर खैरे, संगीता मोहळ, गडपाल सुजित मोहळ आदी उपस्थित होते. गणेश खुटवड यांनी सूत्रसंचालनकेले. श्रमिक गोजमगुंडे यांनी प्रास्ताविक केले.
तिकोना किल्ल्यावर सागवानी दरवाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:18 AM