शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

साहेब, चला आपण पोलिसांत जाऊ

By admin | Published: April 23, 2016 12:46 AM

‘साहेब, चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ. गेल्या ६ दिवसांपासून आम्हाला प्यायला पाणी नाही. पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी पहिल्यांदा पाईपलाईनमधून होणारी पाणीचोरी थांबविणे आवश्यक आहे

बारामती : ‘‘साहेब, चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ. गेल्या ६ दिवसांपासून आम्हाला प्यायला पाणी नाही. पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वी पहिल्यांदा पाईपलाईनमधून होणारी पाणीचोरी थांबविणे आवश्यक आहे. पोलिसांना कारवाई करण्याची विनंती करू,’’ असे साकडे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. के.आगवणे यांना एमआयडीसीतील उद्योजकांनी घातले.येथील एमआयडीसीला ५ दिवसांपासून उजनी जलाशयातून होणारा पाणीपुरवठा ठप्प आहे. सध्या उजनी जलाशयातून पाणी खाली सोडल्यामुळे जलाशयातील पाणीपातळी खालावली आहे. परिणामी, पाणीपुरवठा थांबला आहे. मात्र, पाणीचोरीमुळेच उद्योजकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दत्ता कुंभार, उद्योजक शहाजी रणनवरे, सुनील गोळे, राजन नायर, बापू बाबरे आदींनी आगवणे यांच्या केबिनमध्ये शुक्रवारी (दि. २२) धाव घेतली. या वेळी पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या उद्योजकांनी आगवणे यांना पोलीस ठाण्यात चला, असा आग्रह धरला. सहा दिवसांपासून एमआयडीसीतील ‘रेसिडेन्शियल झोन’ पाण्यापासून वंचित आहे. या भागात पाण्याचे टँकर सुरू करा, असे साकडे घातले. यावर आगवणे यांनी एमआयडीसीला टँकरने पाणीपुरवठा करण्याची तरतूद नसल्याचे कारण सांगितले. त्यावर उद्योजकांनी टँकरसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरही आगवणे यांची नकारघंटा कायम होती. तसेच, पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. उपअभियंता नखाते त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थांबून असल्याचे त्यांनी या उद्योजकांना सांगितले. या वेळी पाणीप्रश्न सोडविण्याबाबत चर्चा करून उद्योजक बाहेर पडले. त्यानंतर कार्याध्यक्ष कुंभार, सुनील गोळे, राजन नायर, अरुण म्हसवडे यांनी थेट उजनी जलाशय गाठला. येथील कामांची या उद्योजकांनी पाहणी केली. भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर यादव यांची सायंकाळी उशिरा भेट घेणार असल्याचे कुंभार यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)