पुणे : प्रवासी गाड्यांना नवीन थांबे, विविध स्थानकांवर पुरविण्यात आलेल्या लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा, लेव्हल क्रॉसिंग रेल्वे फाटजाच्या जागी बदलून भुयारी मार्ग, रोड ओव्हर ब्रिज इ. कामे रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण, रेल्वे थांबे, प्लॅटफॉर्म विस्तार, नवीन गाड्यांचे विद्युतीकरण, स्थानकांवर प्रवाशांसाठी सुविधा, एस्केलेटर, लिफ्ट, नवीन फूट ओव्हर ब्रिज, एलईडी दिवे, यूटीएस मोबाइल ॲप तिकीट प्रणाली, स्थानकांचे सुशोभीकरण आदी विविध विषयांवर शनिवारी विभागीय रेल्वे कार्यालय पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील सातारा, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण , खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी, खासदार श्रीरंग बारणे मावळ, सोलापूर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, लातूरचे खासदार डॉ.सुधाकर श्रंगारे, माढा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,हातकणंगले खासदार धैर्यशील माने , उस्मानाबाद खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर इ. उपस्थित होते. या बैठकीला 24 खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते. यापैकी 9 खासदार उपस्थित राहून आपल्या भागातील रेल्वे बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.
यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी आणि विविध विभागांच्या प्रमुखांसह पुणे आणि सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्यासमवेत विभागीय रेल्वेच्या कामकाज बाबत आढावा घेण्यात आली. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकूण तीनशे पेक्षा जास्त मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये सीएसएमटी-कोल्हापूर एक्स्प्रेस सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत सर्वांनी जोर धरला.