पुण्यातील करोनाची भयावह परिस्थितीमुळे सह्याद्री सिडनी ने ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्याला तेथील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देत लोकवर्गणीतून १२ लाख ५० हजार इतकी रक्कम गोळा झाली. त्यातून ससून रुग्णालयाला अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य खरेदी करत मदत करण्यात आली.
ससून रुग्णालयातील डॉ. मानसिंग साबळे यांच्याशी चर्चा करून त्यांना नेमक्या कोणत्या उपकरणांची गरज आहे, ते पाहून मग त्या उपकरणांची खरेदी केली गेली.
यात ससून रूग्णालयाला अति आवश्यक असणाऱ्या
१: ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर -६
२: ईसीजी मशिन्स -६
३: नॉन वेंटेड एन आय व्ही मास्क ७५ लहान मुलांना करिता व १०० मोठ्यांकरिता खरेदी करण्यात आली आहे.
या उपक्रमात वैद्यकीय साहित्य पुण्यामधील स्थानिक गणेश कुदळे, अमोल परेकर, परमार, सुमित जगताप, चंदन परदेशी यांनी ससून हॉस्पिटलचे डॉ. मुरलीधर तांबे यांना सुपूर्त केले .
डॉ मुरलीधर तांबे - पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालाय असलेले ससून हॉस्पिटलमध्ये एका वर्षात ९५०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर उपचार झाले आहेत. सद्यस्थितीत ६५० कोरोना रुग्ण उपचार घेत असून, ससून रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी उपचार घेतला, संस्थेने केलेल्या या वैद्यकीय मदतीचा फायदा नक्कीच रुग्णाला होणार आहे.