भोर : ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मुंबई ते सातारा दरम्यान काढलेल्या दुचाकी रॅलीत भोर शहरातील तरुणांनी सहभागी होऊन, उत्सफुर्त प्रतिसाद देत या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. मगिल सात वर्षांपासुन संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो.सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील वाघांचे संरक्षण व संर्वधन करण्यासाठी मुंबईतील व्याघ्र संर्वधन संर्वधन व संशोधन केंद्र व डेक्कन अॅडव्हेंचर या संस्थेतर्फे ‘वाघ वाचवा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होत. या रॅलीचे भोर शहरात आमदार संग्राम थोपटे यांनी स्वागत केले. यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजकुमार शेटे, व्याघ्र संर्वधन व संशोधन केंद्राचे अध्यक्ष जगदीश केळकर श्रीधर निगडे, डेक्कन अॅडव्हेंचरचे अध्यक्ष प्रसाद हिरे, प्राचार्य बी के बैरागी,सुनिल खंगल व तरुण उपस्थित होते.मुंबई ते सातारा दरम्यान आयोजीत या रॅलीत संस्थेचे १०० तरुण, ५० तरुणी, ६० दुचाकी व ८ मोटारी एक बस, एक रुग्णवहिका सहभागी आहे. मुंबईहुन निघालेली ही, रॅली वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कास नंतर सातारा शहरात जाणार आहे. दरम्यान काल सकाळी ११ वा भोर येथील महाड नाक्यावर माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी रॅलीस झेंडा दाखवुन पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले, दिवसेंदिवस वाघांची संख्या कमी होत चालली आहे. ही चिंतेची बाब आहे . त्या दुष्टीनेच व्याघ्र संर्वधन व संशेधन संस्थेच्या वतीने वाघ वाचवा मोहिमेचे आयोजन मगिल सात वर्षा पासुन केले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे . (वार्ताहर)
सह्याद्रीचा वाघ वाचवा रॅलीला प्रतिसाद
By admin | Published: December 29, 2014 12:42 AM