सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगवी : सांगवी (ता. बारामती) येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बारामती तालुका पोलिसांनी छापा टाकला. या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत करून सहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद गौतम लोखंडे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सांगवी येथे वाघवस्ती रोडलगतच्या रानात बाभळीच्या झाडाखाली पत्त्याचा डाव चांगलाच रंगला होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर मंगळवार (दि. २७ ) रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपी अनिल ऊर्फ आनंदा संभाजी जगताप (रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे), अमोल दादासो माने (वय २६, रा. सांगवी, ता. बारामती), विशाल अशोक पवार (वय ३४, रा. फलटण, ता. फलटण, जि. सातारा), अशोक शंकर जगताप (रा. सांगवी, ता. बारामती), सनी तानाजी पोंदकुले (रा. शिरवली, ता. बारामती), बाळासो नंदकुमार बागाव (रा. शिरवली, ता. बारामती) यांच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २००५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ व ३७, तसेच साथीचे रोगप्रतिबंधक कायदा, मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान रोख दीड हजार रुपयांची रक्कम, पत्तेचे चार कॅट, ३५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची मोटार सायकल (क्रमांक एमएच ४२/बीसी ५२८२), ४० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची मोटार सायकल (क्रमांक एमएच ४२ / डब्ल्यू ५३२) असा एकूण ७६ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळता जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना बेकायदेशीर पैसे लावून जुगार अड्ड्यांवर वरील सर्व जण पत्ते जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, राहुल पांढरे, विनोद लोखंडे, विजय वाघमोडे यांनी कारवाई केली. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
————————————————