पुणे, दि. 30 - सिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. हा प्रकार सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने गडावर जाणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही दरड कोसळल्याने गडावर असणारे शेकडो पर्यटक अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सकाळी जे पर्यटक गडावर गेले आहेत ते दरड कोसळल्यामुळे अडकून पडले आहे. सुट्टीच्या काळात सिंहगडावर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आज गडावर अनेक पर्यटक फिरायला आले होते. ही गर्दी लक्षात घेऊन गडाच्या खाली सुरक्षारक्षकांनी टप्पा वाहतूक पद्धत सुरू केली आहे. त्यामुळेच दरड कोसळल्याची घटना लक्षात येताचा गडावर जाणारी वाहने सुरक्षा रक्षकांनी अडविल्याने दुर्घटना टळली.
सिंहगडावर दरड कोसळल्यानं अडकले पर्यटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 7:48 PM
सिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.
ठळक मुद्देसिंहगड घाट रस्त्यावर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली.गडावर जाणारी वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला दरड कोसळल्याने गडावर असणारे शेकडो पर्यटक अडकले