काटेवाडी : काटेवाडी परिसरात गौरी-गणपतीचे उत्साहात घरोघरी आगमन झाले. महिलांनी मनोभावे मोठ्या उत्साहात सर्वत्र गौरीपूजन केले.
काटेवाडी येथील मिलिंद व नितीन काटे बंधुंनी गौरीचा सांपद्रायिक सोहळ्याचा देखावा साकारलेला आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे त्या पार्श्वभूमीवर ३५० वर्षांहून जास्त परंपरा असलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा साकारला आहे. या सोहळ्यात पालखी रथाभोवती काटेवाडी येथे वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्यांचे रिंगण पार पडते. हा तसेच पालखी सोहळ्याचे धोतराच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात येते. हा सर्व हलता देखावा साकारलेला आहे.
शासनाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेला तालुक्यातील कन्हेरी येथील नियोजित शिवसृष्टी प्रकल्पाचा देखावा साकारण्यात आला आहे. यामध्ये अश्वारूढ शिवाजी महाराज, पांरपरिक बारा बलुतेदार संकलप चित्र, न्याय-निवाडा, दरबार, कन्हेरी येथील हनुमान मंदिर, वनविभाग नर्सरी आदीसह शिल्पे साकारण्यात आली आहे. गौरी-गणपतीच्या सणाच्या निमित्ताने काटेबंधू नेहमीच नवनवीन उपक्रम देखाव्याच्या माध्यमातून साकारात आहेत. यावर्षी त्यानी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच नियोजित शिवसृष्टी व गौरी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व महाराणी येसूबाईच्या रुपात साकारलेल्या आहेत. हा देखावा पाहण्यासाठी काटेवाडीसह परिसरातील महिला, युवक, आबालवृद्ध भेटी देत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काटे बंधू नियमाचे पालन करत गर्दीवर लक्ष ठेवत आहे.
काटेवाडीसह परिसरातील कन्हेरी, ढेकळवाडी, खताळपट्टा, मासाळवाडी, दीपनगर, लिमटेक परिसरात गौरीचे आगमन झाले. महिलांनी मोठ्या आनंदाने घरात गौरीचे पूजन केले.
—————————————————
फोटो ओळी : काटेवाडी येथे गौरीसमोर साकारलेला पालखी सोहळा व शिवसृष्टीचा देखावा.
१३०९२०२१-बारामती-०२
————————————————