धायरी : नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरात क्रीडासंकुल व्हावे, अशी नागरिकांची मागणी विचारात घेऊन येथील महापालिकेच्या माध्यमातून येथे क्रीडासंकुल बांधण्यात येणार आहे. आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. नगरसेविका ज्योती गोसावी यांनी क्रीडासंकुलासाठी तरतूद करून घेतली आहे.
यावेळी मंजूषा नागपुरे, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, भाजप खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे आदी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात सिंहगड रस्ता परिसरात राहण्यास असलेल्या खेळाडूंची संख्या देखील मोठी असून या परिसरातील शाळा-कॉलेज मधील विद्यार्थीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यासाठी या खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र क्रीडा संकुलाची गरज होती.
हिंगणे खुर्द येथील दोन एकर जागेत इनडोअर व आऊटडोअर क्रीडा प्रकारासाठी क्रीडासंकुल विकसित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी या क्रीडा संकुलामध्ये जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड, क्रिकेट ग्राउंड,व्हॉलीबॉल ग्राउंड,बॅडमिंटन हॉल, कबड्डी ग्राउंड आदी खेळांसाठी सोय असेल.
--------------
सिंहगड रस्ता भागातील खेळाडूंना नाइलाजास्तव पुणे शहरात सरावासाठी जावे लागत होते. या क्रीडा संकुलामुळे त्यांची सोय करण्यात येत असून, त्याठिकाणी त्यांना प्रशिक्षणासह त्यांचा आहार आणि स्पर्धांमध्ये सहभाग, क्रीडा शिष्यवृत्ती इत्यादींबाबत मार्गदर्शनाची सोय देखील उपलब्ध असणार आहे.
- ज्योती गोसावी, नगरसेविका
------------------
फोटो :
१. हिंगणे खुर्द येथे साकारणाऱ्या क्रीडासंकुलाचे संकल्पचित्र
२. क्रीडासंकुलाचे भूमिपूजन करताना आ. माधुरी मिसाळ, नगरसेविका ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप आदी मान्यवर.