पुणे : कात्रज येथील रंगाशेठ चौकातील दुकानदारांकडे ३ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करीत टोळक्याकडून दुकाने बंद करण्यात आली; तसेच हातातील कोयते, तलवारी, बांबू, दगड घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत टँकर व घराच्या खिडकीच्या काचांची तोडफोड करून दुकान उघडणाऱ्या एकाला कोयत्याने जखमी केले. हा प्रकार ऐन भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी घडल्याने सणासुदीच्या दिवशी नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली होती.
पोलिसांनी सांगितले की, कात्रज येथील रंगाशेठ चौकाजवळील, अमीर चिकन सेंटर समोर शुक्रवारी सायंकाळी तुषार चौथवे यांच्या परिसरात राहणारे गणेश मांगडे, सोहन डांगी, सागर रसाळ, उमेश वाघचौरे, मयूर, अंड्या व त्यांचे इतर साथीदार हातामध्ये कोयते, बांबु, दगड घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करु लागले़ कोयते व बांबू हवेत फिरवून येणाºया-जाणाºया लोकांना शिवीगाळ करून दहशत माजवित होते. त्यासोबतच चौकामधील दुकानदारांकडून ३ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करून त्यांची दुकाने बंद केली. तसेच त्यावेळी रस्त्याने जाणाºया टँकरवर दगडफेक करुन नुकसान केले़ तुषार चौथवे व येथील सराईत गुन्हेगार बंटी पवार यांच्यात पूर्वी वाद झाला होता़ तुषार व त्यांचा भाऊ नीलेश चौथवे या दोघांना उमेश वाघचौरे याने दुकान का उघडले, असे म्हणत, तुम्ही आम्हाला हफ्ता देत नाही. तू आमचा मित्र बंटी पवारला मारहाण केली होती. तुला आता सोडतच नाही. तुला खल्लासच करतो, असे मोठ्याने म्हणत तुषार यांना पाठीमागून हाताने दाबून धरले. तर, गणेश मांगडे यांने कोयता मारला. मात्र, त्यांनी तो चुकवल्याने तो कोयता उमेश वाघचौरे याच्या डोक्यात लागून तो जखमी झाला आहे. त्यानंतर त्यांच्या इतर साथीदारांनी हातातील बांबूने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना मारहाण होत असल्याचे पाहून तुषार यांचा भाऊ नीलेश चौथवे, वहिनी, दत्ता व शेजारी राहणारे मित्र भांडणे सोडविण्यासाठी आले़ त्यावेळी त्यांना देखील बांबूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा तुषार व त्यांचा भाऊ नीलेश पळत जावून घरामध्ये लपून बसले़ तेव्हा घरावर दगडफेक करून घराच्या खिडकीच्या काचा फोडून दरवाजावर लाथ मारुन शिवीगाळी करून तुम्ही आम्हाला हफ्ता का देत नाही?आज तुम्हाला खल्लासच करणार, अशी धमकी दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.दोघांसह तीन सराइतांवर गुन्हा दाखलयाप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़ उमेश बबन वाघचौरे (वय २३) आणि सागर शशिराव रसाळ (वय २१, दोघे रा़ आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ तुषार चंद्रकांत चौथवे (वय ३१, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यावरून या दोघांसह सराईत गुन्हेगार गणेश मारुती मांगडे, मयूर, अंड्या व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे़