पुणे : कोरोनामुक्त शहर व्हावे यासाठी सातत्याने नागरिकांना आवाहन करणारे, कुटुंबातील सदस्य यांची पर्वा न करता अहोरात्र बंदोबस्तात सहभागी होऊन कोरोनाचा बिमोड करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलिसांना पगारवाढ मिळावी. अशी याचिका पुण्यातील वकिलांनी उच्च न्यायालयात केली आहे. पगाराबरोवरच इतर सुविधा देखील त्यांना देण्यात यावी अशी मागणी त्यात करण्यात याचिकेत करण्यात आली आहे.
घटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये अॅड. तोसीफ चांद शेख व सतीश एस. गायकवाड यांच्या वतीने अॅड. गणेश गुप्ता, अॅड क्रांती सहाणे,अॅड स्वप्निल गिरमे, अॅड सूरज जाधव, अॅड कादर मिलवाला, अॅड ब्रिजेश कुमार यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी नागरिकांच्या सुरक्षितते साठी पोलिस कर्मचारी, अधिकारी अहोरात्र झटत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर आणि पोलिस कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा आहे. नागरिकांसाठी ते २४ तास कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक काढून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दोन टप्यात देण्याचा निर्णय घेतला. च्या मध्ये पोलिसांच्या हि पगार कपात करून दोन टप्प्यात अदा केले जाणार आहे. शासनाने हे जीआर रद्द कारवा व पोलिस कर्मचार्यांना, बोनसच्या स्वरूपात प्रोत्साहन, अतिरिक्त वेतन, पीपीई (वैयक्तिक संरक्षण उपकरणे) किट उपलब्ध करून द्यावे, जेणे करून पोलिसांचा मनोबल वाढेल, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे