बारामती : शहरातील अडत व्यापाऱ्यांनी शेतकºयांच्या मालाची खरेदी-विक्री दोन दिवसांपासून बंद केली आहे. हे व्यवहार बंद असल्याने नेहमी गजबजलेल्या मार्केट यार्डात मंगळवारी शुकशुकाट होता. येथील अडत व्यापाºयांनी सरकारच्या जाचक अटींच्या विरोधात बंद पुकारल्याने मार्केट यार्डात शुकशुकाट होता. व्यापाºयांनी शेतकºयांचा मालाची खरेदी-विक्री बंद ठेवली आहे. तसेच, शेतकºयांनी त्यांचा माल अडतीवर आणू नये, असे आवाहन केले आहे.
माल मार्केटमध्ये येऊन पडल्यास पावसाचे दिवस असल्याने मालाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पण, या सगळ्याकडे सरकार मुद्दाम डोळेझाक करीत आहे. पणन खात्याकडून वेगवेगळी वक्तव्ये येत असल्याने संभ्रमावस्था निर्माण होत असल्याचे चित्र आहे. सध्या मका, सोयाबीन, तूर, सूर्यफूल, शेंगा, हरभरा, गहू यांचे लिलाव बंद असल्याने मार्केटमध्ये अगदी कमी प्रमाणात वर्दळ दिसत होती.पण, आता व्यापारी शेतकºयांचा माल घेत नसल्याने ते उचल देत नाहीत. माल असूनदेखील शेतकºयांना तो विकता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मार्केट यार्डात ३० ते ३५ आडत व्यापारी आहेत. या सगळ्या व्यापाºयांनी शेतकºयांची मालाची खरेदी-विक्री बंद केली आहे. तसेच या बंदमुळे हातावरचे पोट असणाºया लोकांचीपण अडचण होत आहे. भाड्याने गाडी चालवणारे वाहनचालक, हमाल, काटा करणारे, कामगार यांनादेखील काम नाही, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महावीर शहा वडूजकर, मिलिंद सालपे, प्रताप सातव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गुळाला हमीभाव नसल्याने गुळाचे लिलाव सुरू आहेत. हमीभावाच्या नावाखाली शेतकºयांना खूष करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत, असे व्यापाºयांनी सांगितले. या संपाला नगर येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यापाºयांना पाठिंबा दर्शविला आहे.सरकारने कायदा करताना त्यासाठीच्या तरतुदी करणे आवश्यक आहे. पुरेशी गोदामे बांधणे, त्याचप्रमाणे शेतकºयांचा सगळा माल हमीभावात खरेदी करणे, १० क्विंटलची आवक झाली तर सरकार फक्त ३ क्विंटल चांगल्या दर्जाचा माल खरेदी करते. राहिलेला ७ क्विंटल माल हा व्यापारी घेतात; मग मालाची प्रतवारी करून त्याची विक्री ते करतात. यात व्यापाºयाला नुकसानदेखील होऊ शकते.४व्यापारी शेतकºयांना रोख पैसे देतात; पण सरकारकडून पैसे मिळायला ४ ते ५ महिने लागतात. शेतकºयांना गरज लागल्यास त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी किंवा लग्नासाठी, त्यांच्या अडीअडचणीला व्यापारी उचल देत होते.