लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या ताब्यातून पाच पिस्तुल आणि १६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. नितीन सुधाकर अवचित्ते (वय ३०, रा. रहनेश्वरवाडी, तळेगाव, ता. मावळ व यशवंतनगर, येरवडा), मयूर रामदास सुतार (वय २९, रा. गणेश प्लाझा, माळीनगर, वडगाव, पुणे), सागर बबन गोळे (रा. नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांनी हे पिस्तुल कोणाकडून व कोठून खरेदी केले, संबंधित पिस्तुले शहरातील गुन्ह्यात वापरली गेली आहेत का, तसेच गुन्ह्याचा अधिक तपास करायचा असल्याने सरकारी वकिलांनी केलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने ग्राह्य धरली.
पिस्तुलाची विक्री; तिघांना अटक
By admin | Published: July 17, 2017 4:20 AM