पुणे : केंद्र सरकारने घरबांधणीला दिलेले प्रोत्साहन, परवडणाऱ्या घरांसाठी देऊ केलेल्या सवलती यामुळे बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राला काहीशी उभारी मिळाल्याचे चित्र आहे. पुण्यासह देशभरातील महानगरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये तब्बल १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. पुण्यामध्येच सदनिकांच्या विक्रीत २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे जानेवारी २०१९ अखेरीस २३ हजार कोटींचा महसूल जमा झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षांत २४ हजार कोटींचा महसूल जमा करण्याचे उद्दीष्ट मुद्रांक विभागाला दिले होते. जानेवारीमध्येच ते टप्प्यात आल्याने, सरकारने २५ हजार कोटी रुपयांच्या महसुलवाढीचे सुधारीत उद्दीष्ट दिले आहे. नोटबंदी, रेरा कायदा आणि जीएसटी अशा पाठोपाठ आलेल्या बदलांमुळे बांधकाम व्यवसायासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातून बांधकाम क्षेत्र सावरत असल्याचे दिसून येत आहे.मालमत्ता सल्लागार अनुज पुरी यांनी सांगितले,केंद्रशासीत प्रदेश, मुंबई महानगर, बेंगळुरु, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमध्ये २०१८मध्ये १ लाख ९५ हजार ३०० नवीन सदनिका बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. प्रत्यक्षात त्याहून अधिक २ लाख ४८ हजार ३०० घरांची विक्री झाली. २०१७च्या तुलनेत २०१८मध्ये विक्रीत ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नव्याने बांधलेल्या सदनिकांपैकी ७७ हजार ५९० सदनिका या चाळीस लाखांच्या आतील, तर ७० हजार ७० सदनिका या चाळीस ते ८० लाखांच्या दरम्यानच्या आहेत. चेन्नई (१७ टक्के घट) वगळता इतर सहा ठिकाणी घरांच्या मागणीत वाढआहे. बेंगळुरुत मागणीत सर्वाधिक ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.२०१८ मधील किंमती निहाय सदनिकांची उपलब्धतासदनिकांची श्रेणी २०१८चाळीस लाखांखालील ७७,५९०४० ते ८० लाख ७०,०७०८० लाख ते दीड कोटी ३०,३००दीड ते अडीच कोटी ९,४१०अडीच कोटी ७,९३०एकूण १,९५,३००
सदनिकांच्या विक्रीत १८ टक्क्यांनी वाढ, महानगरातील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 1:51 AM