शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीच्या काळातही पुण्यात सहा हजार वाहनांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 11:58 AM

वाहनखरेदीचे लुटले सोने..

ठळक मुद्देचारचाकी वाहनांच्या विक्रीत साडेपाचशेंनी वाढगेल्या तीन वर्षांपासून दुचाकींच्या विक्रीत घट

पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे वातावरण असल्याची ओरड होत असली, तरी ग्राहकांनी वाहनखरेदीचे सोने लुटून वाहन उद्योगांची चांगलीच चांदी केली आहे. उलट, गेल्या वर्षीपेक्षा यंदा चारचाकी वाहनांच्या विक्रीत तब्बल साडेपाचशे वाहनांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी कठीण असल्याचे सांगण्यात येत होते. केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन दिल्याने पेट्रोल-डिझेल वाहनांचा खप कमी होत असल्याची कुजबुज सुरू झाली होती. अखेर केंद्र सरकारने वाहन उद्योगाला सवलत देण्याचे जाहीर केले. वस्तू आणि सेवा करातील कर श्रेणीमधेही उद्योगांना सवलत दिली. याशिवाय, सध्याची वाहने इतक्यात बंद होणार नसल्याचे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाला जाहीर करावे लागले. नाशिकमधे नवरात्राला एकाच दिवशी अडीचशे ट्रॅक्टरची विक्री झाली. ही बातमी शिळी होण्यापूर्वीच दसऱ्याला देखील वाहन उद्योगात गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीअंशी का होईना, तेजीच दिसून येत आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) दसऱ्याच्या दिवशी तब्बल ५ हजार ९३२ वाहनांची विक्री झाली असल्याची नोंद झाली. दसऱ्याच्या दिवशी वाहन नेण्यासाठी ग्राहक त्यापूर्वीच्या सप्ताहात वाहन विक्रेत्यांकडे अगाऊ नोंदणी करतात. दसऱ्याच्या दिवशी वाहन घरी नेतात. हीच प्रथा या वषीर्देखील कायम होती. गेल्या तीन वर्षांपासून दुचाकींच्या विक्रीत घट दिसून येत आहे. शहरात २०१७मध्ये दसऱ्याला तब्बल ८,६८९ वाहनांची विक्री झाली होती. त्यातुलनेत यंदा ५,९३२ वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वषीर्पेक्षा (२०१८) यंदा एकूण वाहनविक्रीत ८२ वाहनांची विक्री अधिक झाली आहे. चारचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याने यंदा वाहनविक्रीने जवळपास सहा हजारांच्या घरात प्रवेश केला. वाहनविक्रीतून सरकारच्या तिजोरीत २३ कोटी १९ लाख २५ हजार ५८९ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ...........पितृपक्षापूवीर्चे चार महिने वाहन उद्योगासाठी अलीकडच्या काळातील खूप कठीण दिवस होते. मात्र, नवरात्रापासून चारचाकी गाड्यांना चांगली मागणी आहे. त्यातही सात ते दहा लाख किमतीतील प्रीमियम श्रेणीतील एसयूव्ही आणि हॅशबॅक गाड्यांना ग्राहकांची पसंती आहे. आमच्या दालनातून दसºयाला २०३ चारचाकी वाहनांचे वितरण झाले. - युवराज पवार, शाखाप्रमुख, ह्युंदाई कोठारी, शंकरशेठ रस्ता  .........वार्षिक सरासरीपेक्षा दुचाकींची तुलनेने कमी विक्री झाली आहे. मात्र, नवरात्रापासून दुचाकींच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच, दर वर्षी उत्सवकाळात होणारी वाहनविक्री लक्षात घेतल्यास त्यात वीस टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. - अर्चना देशपांडे, माय विंग्ज (होंडा), विक्री महाव्यवस्थापक.........]महसूल रुपयांत...२६,९६,४२,८५६२०,६५,००,०००२३,१९,२५,५८९ .............वाहन प्रकार           २०१७    २०१८    २०१९मोटारसायकल        ५७४१    ४११५    ३८५२मोटारकार              २०७५    ९७०    १५१५वाहतुकीची वाहने     ८७३    ७६५    ५६५एकूण                      ८६८९    ५८५०    ५९३२

टॅग्स :PuneपुणेAutomobileवाहनfour wheelerफोर व्हीलरDasaraदसराRto officeआरटीओ ऑफीस