शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जिंकलंस भावा! रुग्णवाहिका चालकाची थोर माणुसकी; ३३२ कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 6:31 PM

कितीही मोठं मोठी संकटे आली तरी पुरून उरते माणुसकी...

ठळक मुद्देकोरोनामुळे सर्वत्र बिकट अवस्था, मृत होत असलेल्यांच्या संख्येतही वाढ

नारायणगाव: कोरोनामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. मृत होत असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. अशा या विदारक परिस्थितीमध्ये मृत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोण अंत्यसंस्कार करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. पण अशावेळीच संकटकाळी माणुसकीचे पाईक पुढे येतात. नारायणगाव येथील अशाच एका सेवकाने ३३२ कोरोनाग्रस्तांचे अंत्यसंस्कार केले आहेत. संजय भागुजी भोर असे त्यांचे नाव आहे.

संजय भोर (वय ३८) हे रुग्णवाहिका चालक आहेत. आई, बहीण व पत्नी असा त्यांचा परिवार आहे. गेल्या एक वर्षापासून नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात ते कार्यरत आहे. वर्षभरापासून नागरिकांच्या डोक्यावर कोरोना संकटाची टांगती तलवार आहे. सुरुवातीला कोरोनाग्रस्त असल्याचे समजल्यावर त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला जायचा. जवळचे नातेवाईकही कोरोनाबाधिताजवळ जाण्यास घाबरत होते. मृत झालेल्या जवळच्या व्यक्तीचा अंत्यविधी कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांचे समाज कार्य सुरु झाले. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील ३३२ कोरोनाबाधित रुग्णांचे अंत्यविधी केले आहेत .

केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या वर्षभरापासून ते कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची ने-आण, त्यांना जेवण, पाणी, गोळ्या देणे, ऑक्सिजनच्या टाक्या आणणे, रुग्णांच्या संपूर्ण देखभाली बरोबरच रुग्णालयाची साफसफाईची कामे ते करत आहेत.

विशेष म्हणजे विना मोबदला घेता ते ही सर्व कामे ते करत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि कोरोना योद्धा म्हणून खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या संजय भोर यांचे सर्वत्र कौतुक होत असून नारायणगाव ग्रामस्थांनी तर त्यांच्या कार्याला सलाम केला आहे .

टॅग्स :narayangaonनारायणगावPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक