लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे:- प्रत्येक जवान हा मायभूमीच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने जीवाची बाजी लावून सीमांचे संरक्षण करीत असतो. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्ही दलांना अतिशय जवळून पाहण्याची संधी मिळाली. आपल्या सीमा जवळून पाहता आल्या. सैनिकांच्या अतुलनीय धाडसासाठी त्यांना सॅल्यूट करावेसे वाटते अशी भावना माजी संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.
कारगिल विजय दिवसा निमित्त (दि.26) आणि गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाशपर्वा निमित्त सरहद संस्था आणि लडाख पोलीस यांच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने कारगिल सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडचे उद्घाटन भामरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. तसेच नॅशनल वॉर मेमोरियल येथे हुताम्यांना सुभाष भामरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शनिवार वाडा येथेून प्रांरभ झालेल्या या दौडची घोरपडी येथील सदर्न कमांड नॅशनल वॉर मेमोरियल येथे समाप्ती झाली.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भाजपचे पुणे शहर संघटन सरचिटणीस आणि कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे समन्वयक राजेश पांडे, कोहिनूर उद्योग समुहाचे प्रमुख आणि तेग बहादूर यांच्या 400 व्या प्रकाश पर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, तेग बहादूर 400 वे प्रकाश पर्व समितीचे आयोजक संतसिंग मोखा, समितीचे कार्यकारी अध्यक्ष चरणजित सिंग सहानी,समितीचे कार्यकारी अध्यक्ष सुरेंद्र वाधवा, मॅरेथॉनचे मुख्य संयोजक अरविंद बिजवे, समितीचे सदस्य अमर छाबडा, नरिंदर पाल सिंग बक्षी, सुरिंंदर सिंग धुपर, दलजित सिंग रँक, अर्हम फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारीया, युवराज शहा उपस्थित होते.
----------------------