तळेगाव दाभाडे : कलापिनी आयोजित कै. मेजर ना.वा. खानखोजे चित्रकला स्पर्धेत अंकिता समंता, गायत्री गायकवाड, पार्थ टाकसाळे, कोमल सोनोने, सायली जगताप या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. पालक गटात मिलिंद बारहाते विजेते ठरले.स्पर्धेची अंतिम फेरी कलापिनी सांस्कृतिक केंद्रात उत्साहात पार पडली. स्पर्धेचे हे ३३ वे वर्ष होते. या वर्षी या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात ७०० व माध्यमिक गटात ६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. माध्यमिक गटासाठी अंतिम फेरीपूर्वी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत उत्कर्षा नगरे यांनी मार्गदर्शन केले. अंतिम फेरीचे परीक्षण उत्कर्षा नागरे आणि किरण खानखोजे यांनी तर प्राथमिक फेरीचे परीक्षण कोमल डावखरे यांनी केले.पारितोषिक वितरण तळेगावातील ज्येष्ठ कलावंत विद्याधर दाते आणि वैजयंती दाते आणि किरण खानखोजे यांच्या हस्ते झाले. कलापिनीच्या उपाध्यक्षा शर्मिला शहा, अंजली सहस्रबुद्धे, हेमंत झेंडे आणि अशोक बकरे उपस्थित होते.चित्रकला स्पर्धेचे संयोजन वैजयंती दाते यांनी केले. सूत्रसंचालन विजय कुलकर्णी आणि नयन धडफळे यांनी केले. संयोजन विराज सवाई,चेतन पंडित,आदित्य धामणकर,प्रसाद काशीकर,समीर नरवडे,राहुल मुलमुले, विशाखा बेके,मुकुंद इनामदार,राम रानडे,,श्रीपाद बुरसे, हृतिक पाटील आणि शार्दुल गद्रे यांनी केले.गटनिहाय प्रथम क्रमांक विजेते : बालवाडी : अंकिता समंता, हॅचिंग स्कूल. शिशुगट : गायत्री गायकवाड, बालविकास विद्यालय. लहान गट : पार्थ टाकसाळे, सिद्धार्थ इंटरनॅशनल स्कूल. मध्यम गट : कोमल सोनोने, अण्णासाहेब चौभे स्कूल. मोठा गट: सायली जगताप, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन. पालक गट : मिलिंद बारहाते. (वार्ताहर)
समंता, टाकसाळे, सोनोने प्रथम
By admin | Published: February 21, 2017 2:29 AM