पुणे - कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणात विविध आरोप- प्रत्यारोप होत असल्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे, असे नमूद करीत न्यायालयाने शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि रावसाहेब पाटील यांच्यासह सुमारे ५५ संशयित आरोपींना म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली आहे.नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, लाइव्ह डिटेक्टर टेस्ट, आवाजाचे विश्लेषण आणि कॉल रेकॉर्डिंगच्या माहितीबाबत भिडे यांच्यासह इतर संशयित आरोपींनी आपले म्हणणे सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणात न्यायालयात अनेक अर्ज दाखल करण्यात आलेले होते. त्यातील अॅड. नितीन सातपुते यांनी संजय भालेराव यांच्यावतीने दाखल केलेल्या एका अर्जावरून न्यायालयाने संभाजी भिडे आणि रावसाहेब पाटील यांच्यासह सुमारे ५५ संशयित आरोपींना म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. दंगलीत संजय भालेराव यांची इनोव्हा कार जाळण्यात आली होती.
संभाजी भिडेंना कोर्टाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 5:12 AM