पुणे : ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकारामच्या गजरात पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. मागील वर्षीप्रमाणे यंदाही संभाजी भिडे गुरुजी यांनी तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य केले.यंदा पालखीचे 334वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत लाखो वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.मागच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात संभाजी भिडे गुरूजी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी दोन्ही पालखी प्रमुखांनी धारकर्यांच्या सहभागामुळे पालखी मार्गात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर मागील वर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गाच्यामध्ये पारंपरिक क्रम मोडून मज्जाव करण्यात आला होता. यंदाही शांततामय मार्गाने पालखी सोहळयात पालख्यांच्या नियमानुसार पाठीमागे चालत सहभागी होण्यास बंदी नसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.मात्र मागील वर्षप्रमाणे यंदाही भिडे समर्थक धारकरी यांनी शिवाजीनगर भागात बैठक मारली असून त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान संभाजी भिडे गुरुजींनी तुकाराम पालखी रथाचे काही अंतर सारथ्य केले.काही वेळातच माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ दाखल होणार असून तिथेही त्यांना असाच मान मिळेल का याबाबत उत्सुकता आहे
संभाजी भिडे गुरुजींनी केले तुकाराम महाराजांच्या पालखीचे सारथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 6:20 PM
मागच्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गात संभाजी भिडे गुरूजी व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता.
ठळक मुद्देपालख्यांच्या पाठीमागे चालत सहभागी होण्यास बंदी नसणार असल्याचे पोलिसांकडून परवानगी