पुणे : संभाजी पुलावर दिवसाच्या कोणत्याही वेळी वाहतूक पोलीस दुचाकीबंदी तोडून आलेल्या वाहनचालकावर कारवाई करताना दिसतात. किंबहुना दोन्ही बाजूला जणू दबा धरून बसलेले असतात. परंतु, कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे आलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर कोपऱ्यावर उभे राहून दुचाकीचालकांवर कारवाई करू नका. त्याऐवजी वाहतूक पोलिसांनी प्रबोधन करावे, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी केल्या आहेत.डेक्कन येथील खंडुजीबाबा चौक आणि लक्ष्मी रस्त्यावरील टिळक चौकाला जोडणारा संभाजी पूल दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. बाहेरगावाहून येणाºया दुचाकीस्वाराला या नियमांची माहिती नसल्याने ते डेक्कन किंवा टिळक रस्त्याच्या दिशेने निघाल्यास पुलाच्या दोन्ही टोकांना थांबलेले वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांवर कारवाई करतात. संभाजी पुलावर प्रवेश करण्यापूर्वी दुचाकीस्वारांवर रोखा. संभाजी पूल दुचाकी वाहनांसाठी खुला नसल्याचे चालकांना सांगा, असे पोलीस उपायुक्त मोराळे यांनी सांगितले.संभाजी पुलावरून आलेल्या दुचाकीस्वाराला लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका पोलीस कर्मचाºयाला गेल्या महिन्यात अटक केली होती़ त्या वेळीही हा प्रश्न चर्चेत आला होता़ मेट्रो मार्गामुळे वाहतूककोंडी वाढली आहे.>ंएकेरी वाहतुकीमुळे झेड ब्रीज मोकळाचभिडे पूल व संभाजी पुलावर वाहनांची गर्दी असताना त्या दोघांमधील झेड ब्रीज वाहतूक शाखेच्या एकेरी वाहतुकीमुळे मोकळा पडत असून त्यावरुन गाड्या जाण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य झाले आहे़ जंगली महाराज रोड एकेरी केल्याने भांडारकर रोडवरून येणाºया सर्व दुचाकी भिडे पुलावरून नदीपलीकडे जातात़ पूर्वी त्या डावीकडून झेड ब्रीजवरून नारायण पेठेत येत होत्या़ नारायण पेठेत जेथे झेड ब्रीज उतरतो, त्या चौकापासून डावीकडे टिळक चौकाकडे जाण्यास बंदी करण्यात आली आहे़ तसेच लक्ष्मी रोडवरील दुचाकी पूर्वी या चौकातून येऊन झेड ब्रीजचा वापर करीत असत़ त्या रस्त्यावरही लक्ष्मी रोडवरून येता येत नसल्याने सर्व दुचाकी शास्त्री रोडला लागून पूना हॉस्पिटलपासून नदी पार करून कर्वे रोडला लागून इच्छितस्थळी जातात़ त्यामुळे एका बाजूला झेड ब्रीज रिकामा ते यशवंतराव चव्हाण पूल व भिडे पुलावर गर्दी असे चित्र या ठिकाणी दिसत आहे़>त्या परिपत्रकामुळे घोळदुचाकीस्वारांचे प्रबोधन करा. कारवाई शिथिल करा, असे आदेश देण्यात आले असताना वाहतूक शाखेच्या एका पोलीस निरीक्षकाने वाहतूक शाखेतील कर्मचाºयांना सूचना देण्यासाठी कार्यालयीन पत्रक काढले. या परिपत्रकात खंडुजीबाबा चौकात असलेल्या पोलिसांनी कारवाई थांबवावी. दुचाकीस्वारांवर कारवाई करणाºया पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे त्या परिपत्रकात म्हटल्याने गोंधळ निर्माण झाला.संभाजी पुलावर कारवाई शिथिल करा. वाहनचालकांचे प्रबोधन करा, असे आदेश असताना पत्रक काढल्याने काहीसा गोंधळ उडाला. सोशल मीडियावर हे पत्रक व्हायरल झाल्यानंतर संभाजी पूल दुचाकी वाहतुकीसाठी खुला असा अर्थ काढण्यात आला आणि तसे संदेश प्रसारित करण्यात आले. त्यामुळे संभाजी पुलावरून दुचाकीला बंदी आहेच, असे वाहतूक शाखेला जाहीर करण्याची वेळ आली आहे़
संभाजी पुलावरील घुसखोरांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:54 AM