पुणे : ''गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता'', असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) जंगली महाराज मंदिरात अापल्या धारकऱ्यांना संबाेधित करताना केले हाेते. संभाजी भिडेंचे वक्तव्य वादग्रस्त व संविधान विराेधी अाहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे वक्तव्य केल्याने अामच्या भावना दुखावल्या असून अामच्या महापुरुषांची बदनामी करण्यात अाली अाहे. असे म्हणत संभाजी ब्रिगेडने भिडेंवर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज संभाजी ब्रिगेडकडने शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये दिला अाहे.
संभाजी भिडे यांनी शनिवारी अापल्या धारकऱ्यांना जंगली महाराज मंदिरात संबाेधित केले. त्यावेळी मनु हा संत ज्ञानेश्वर अाणि तुकाराम महाराजांपेक्षा एक पाऊल पुढे हाेता असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले हाेते. त्यावर विविध स्तरातून टीका झाली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात भिडेंचे वक्तव्य तपासून ते संविधान विराेधी असल्यास कारवाई करु असे अाश्वासन दिले. भिडेंच्या याच वक्तव्याच्या विराेधात महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडकडून देण्यात अाला अाहे. या अर्जात म्हंटले अाहे की, जंगली महाराज मंदिरात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संभाजी भिडे यांचे व्याख्यान ठेवण्यात अाले हाेते. या व्याख्यानात भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीर समर्थन केले अाहे. हे संविधान विराेधी अाहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे अाक्षेपार्ह व संतापजनक वक्तव्य केल्यामुळे अामच्या भावना दुखावल्या असून अामच्या महापुरुषांची बदनामी करण्यात अालेली अाहे.
मनुस्मृतीचे समर्थन करणे व महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या जगतगुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना कमी लेखने, त्यांचा अवमान करणे हे वादग्रस्त अाहे. या अागाेदर नाशिक व धुळे येथे मनुस्मृतीचे समर्थन भिडे यांनी केले अाहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे समाजात सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन भिडे यांच्यावर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात अाली अाहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी हा तक्रार अर्ज शिवाजीनगर पाेलीस स्टेशनमध्ये दिला.