गेल्या काही दिवसांत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त रस्त्यावर आले आहेत. अनेकांचे उद्योग व्यवसाय घरे पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे. परिणामी सर्वसामान्यांचे संसार उघड्यावर आल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी तातडीने मदत केंद्र सुरू केली आहेत. या ठिकाणी केवळ वस्तू स्वरूपात मदत घेतली जात आहे. यामध्ये किराणा किट, पाणी, ब्लँकेट स्वरुपात मदत स्वीकारली जात आहे. गेल्या दोन दिवसांत ५०० किराणा किटची मदत नागरिकांनी केली आहे. जवळपास ७०० किराणा किट जमा होण्याचा अंदाज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बारामती शहरातील हॉटेल शिवेंद्रसह अशोकनगर येथील आर. जे. सायकल, एमआयडीसीतील ऐश्वर्या बेकरी, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना समोर मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. दरम्यान सध्या कोल्हापूर, सातारा महामार्ग बंद आहेत. हे महामार्ग सुरू झाल्यावर त्या ठिकाणी येत्या दोन दिवसांत मदत पोहचविण्याचा मानस संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पूरग्रस्तांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुरू केलेल्या मदत केंद्रावर विविध वस्तू जमा करण्यात आल्या आहेत.
२६०७२०२१ बारामती—०३