येत्या पंधरा दिवसांत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते गंगाधर बनबरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला जाणार आहे. संघटनात्मक बांधणीवरही लक्ष दिले जाणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उत्तम कामठे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संदीप कारेकर, ज्योतिबा नरवडे, अशोक फाजगे, मोहितीन रणदिवे, अभिजित मोरे, नितीन वाघिरे, सचिन गायकवाड, अजय माने आदी यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडी २०२२ च्या निवडणुका एकत्रपणाने लढवणार असेल तर मोठ्या प्रमाणात नाराज गट तयार होणार आहे. याचा फायदा संभाजी ब्रिगेडला होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पूर्णपणे ओसरली असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप पूर्ण अपयशी ठरला आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर सामान्य माणूस आधीपासूनच चिडला आहे. दोन्ही सरकारांवर त्याचा रोष असल्याचा फायदा संभाजी ब्रिगेडला होईल असा दावा यावेळी करण्यात आला.