राज्य सरकारने ही मागणी त्वरीत मान्य न केल्यास राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. ५) दिला. ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र असूनही ते दिले जात नसल्याने मराठा समाजात तीव्र असंतोष आहे. याची प्रतिक्रीया उमटल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
-----------------
मराठा महासंघाचा आरोप तथ्यहीन असल्याचा संभाजी ब्रिगेडचा दावा
शरद पवारांची तरफदारी : प्रवीण गायकवाड यांची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘ठरवले असते तर शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण देता आले असते. मात्र त्यांनी मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले,’ असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे सुमारे चाळीस वर्षे अध्यक्ष असलेल्या अँड. शशिकांत पवार यांनी नुकतेच व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडने मात्र अँड. शशिकांत पवार यांचे मत खोडून काढले आहे.
“मराठा समाजावर शरद पवारांनी अन्याय केल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे केला जात आहे. मात्र तो तथ्यहीन आहे,” असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
गायकवाड म्हणाले की, शरद पवार यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरील आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री असताना पवार यांनी १९७८-८० मध्ये राज्यातील सर्व मागास प्रवर्गांना आर्थिक निकष लावून ८० टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले होते. मात्र १९८५ मध्ये हे आरक्षण रद्द झाले.
सन १९८० ते ९० या दशकात मराठा महासंघाने मंडल आयोगाला विरोध करायला सुरुवात केली. याचवेळी मराठा महासंघाने आर्थिक निकषावरील आरक्षणाची मागणी लावून धरल्याचे गायकवाड म्हणाले. त्यावेळी ‘मंडल’च्या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात २७ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. १९९३ पर्यंत हे खटले चालले. सन १९८९-९१ या काळात पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा हा घटनाक्रम आहे. मात्र आरक्षण कोर्टात अडकल्याने पवारांनी ठरवले असते तरी ते देऊ शकले नसते, असे गायकवाड म्हणाले.
चौकट
दोन्ही पवारांमध्ये त्यावेळी नव्हते धाडस
शरद पवार मुख्यमंत्री असताना देशात सर्वात प्रथम ओबीसी आरक्षण लागू केले हे खरे. पण त्यावेळी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू करता आले असते का, असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित केला. त्या काळात मराठा समाज स्वत:ला मागासवर्गीय म्हणवून घेण्यास तयार नव्हता. त्यांना ओबीसीत टाकण्याचे धाडस ना पवार करु शकले असते ना अँड शशिकांत पवार असी टिप्पणी गायकवाड यांनी केली.