पुणे : महिलांकरिता डेक्कनवरील संभाजी पूल (लकडी पूल) येथील स्वच्छतागृह अद्याप वापराविना पडून आहे. त्या अत्याधुनिक स्वच्छतागृहात सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे ते वापरण्यास अडथळे येत आहेत; तसेच या स्वच्छतागृहाच्या बाजूला आता गर्दुल्यांच्या अरेरावीचा त्रास पुलावर फेरफटका मारण्यास येणाºया ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी त्या जागी अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून, त्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहरात एकीकडे महिलांच्या स्वच्छतागृहांची गैरसोय असताना दुसºया बाजूला जिथे नव्याने अत्याधुनिक प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहे, ती वापराविना पडून आहेत. त्याचा उपयोग होण्याऐवजी त्यामुळे उपद्रव वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. पुलावरील पदपथालगतच्या जागेत कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. अनेक जण त्या जागेत उघडपणे लघुशंकेस जात आहेत. या सगळ्या त्रासाबाबत नागरिकांची सनद अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. संभाजी पुलाच्या बाजूवरील जागा पालिका प्रशासनाची आहे की खासगी मालकीची, याची चौकशी होऊन तेथील स्वच्छता करण्यात यावी. सायंकाळच्या वेळी फेरफटका मारण्यास येणाºया-जाणाºया ज्येष्ठ नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारी पदपथाचा दुरुपयोग होत असून, त्याठिकाणी रात्रीच्या वेळी नशापाणी करणाºयांची संख्या वाढत आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. संभाजी पुलावर मागील वर्षी नव्याने उभारण्यात आलेल्या महिला स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून वापराविना पडून आहे. त्यातील विद्युतयंत्रणा कधी सुरु तर कधी बंद अशा अवस्थेत आहे. याविषयी अधिक माहिती देताना पुलावर गेल्या दहा वर्षांपासून फेरफटका मारण्याकरिता येणाºया श्रीनिवास लेले यांनी सांगितले, अतिक्रमण, दुर्गंधी यामुळे संभाजीपुलावर कमालीची अस्वच्छता पसरली आहे. पालिका प्रशासनाकडून कारवाई करताना पुन्हा हद्दीचा वाद निर्माण होऊ नये याकरिता घोले रस्ता, कर्वे रस्ता आणि विश्रामबागवाड्याच्या क्षेत्रीय कार्यालयात तक्रार नोंदविण्यात आली आहे. रात्री लोक तात्पुरता निवारा तयार करुन तिथे राहून अस्वच्छता करतात. यामुळे दुर्गंधी पसरते.बेशिस्त नागरिकांमुळे परिसर झाला अस्वच्छसंभाजीपुलावर नव्याने बसण्याकरिता सिमेंटचा चौथरा तयार करण्यात आला आहे. मात्र त्यावर झोपडपट्टीतील व्यक्ती येऊन दिवसभर बसतात. तसेच तिथे निवारा तयार करुन झोपतात. बºयाचदा रात्रीच्या वेळी तिथे दारुडे आणि गर्दुल्यांची अरेरावी वाढत आहे.४काही वेळा त्या पुलावर उभे राहून नव्याने उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या आड वेश्याव्यवसाय सुरु असल्याची तक्रार पुलावर फेरफटका मारण्यास येणाºया नागरिकांनी केली आहे. तसेच पूर्वी या पुलावर स्वच्छतागृह नव्हते.४पालिका दरवेळी नवनवीन कल्पना अंमलात आणून त्या राबवते. मात्र त्याची व्यवस्थित निगा राखली जात नसल्याने आणि काही बेशिस्त लोकांमुळे संबंधित परिसर कमालीचा अस्वच्छ होत आहे.ते स्वच्छतागृह नेमके कुणासाठी ?संभाजीपुलावर नागरिकांची वर्दळ सतत सुरु असते. पुलावर बसण्याकरिता बाकड्यांची सोय करण्यात आली आहे. त्याच्या शेजारीच महिलांकरिता स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. जेव्हा एखाद्या महिलेला तातडीने त्या स्वच्छतागृहात जायचे असते त्यावेळी ते बºयाच वेळा बंद अवस्थेत असते. स्वयंचलित अशा त्या स्वच्छतागृहात सातत्याने तांत्रिक बिघाड होत असतात. याशिवाय त्या बाकड्यावर बसलेल्या पुरुषांमुळे अनेकदा महिला त्या स्वच्छतागृहात जाण्याचे टाळतात. अशावेळी नेमके ते स्वच्छतागृह कुणाकरिता बांधण्यात आले आहे? असा प्रश्न निर्माण होतो. याउलट कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाजवळील बसस्टॉपजवळ एखादे स्वच्छतागृह उभारल्यास त्याचा उपयोग होईल. - एक त्रस्त महिला