पुणे : मराठा समाजातील मुलांसाठी काम करणारी सारथी संस्था वाचविण्यासाठी शनिवारी खासदार छत्रपती संभाजीराजे सारथी संस्थेच्या बाहेर उपोषण करणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, सारथीबाबत दोन बाजू समोर येत आहेत. या संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. पण चांगले काम असेल तर ते अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामुळे संभाजी राजे यांनी उपोषण करु नये, असे माझे आवाहन आहे. या संदर्भात मुंबईत संबंधित विभागाचे सचिव व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल, या बैठकीसाठी संभाजी राजे यांनी देखील उपस्थित राहावे.पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी शनिवारी निवडणूक होत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्यावर उपस्थित होते.>माझ्या स्टाईलने अधिकारी काम करतीलपक्षाचे नेते शरद पवार यांच्याप्रमाणेच मला देखील सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय आहे. आता ही सवय आहे, ती आहे पण अधिकाऱ्यांना देखील माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. आठवड्यातून एक-दोन दिवस अधिकाºयांना लवकर उठावे लागेल. पण सर्व विभागाचे अधिकारी मला चांगले सहकार्य करतात आणि यापुढे देखील माझ्या स्टाईलने अधिकारी काम करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
संभाजी राजेंनी उपोषण करू नये, अजित पवारांची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:00 AM