लॉकडाऊन लागणार की निर्बंध अधिक कडक होणार ह्या अनिश्चितते मूळे लोकांचा खरेदीसाठी एकच गोंधळ उडून तुंबळ गर्दी झाल्याचे चित्र उत्तमनगरसह शहरात अनेक ठिकाणी पहावयास मिळाले .शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी लोकांनी गरजोपयोगी गोष्टींच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत एकूणच सोशल डीस्टॅसिंग चा फज्जा पाडल्याचे दिसून आले.
लॉकडाऊन चा विरोध चारीही बाजूनी होत आहे परंतु अचानक जर लोकडाऊन जाहीर केला तर मागच्या वर्षी सारखा त्रास होऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेऊन सर्व गोष्टी जमा करण्यावर लोकांचा कल दिसून आला.
लोकांना लोकडाऊन नको आहे,पूर्ण बाजारपेठ बंद न करता लोकांना जर कोरोना पासून बचाव कसा करायचा ह्याच्या उपाययोजना केल्या तर कोरोनाचा प्रसार रोखण्यास काही प्रमाणात हातभार लागेल.मागील एक वर्षांपासून आलेल्या ह्या संकटामुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून आता परत जर सर्व बंद केले तर लोकांच्या खाण्यापिण्याचे प्रश्न उभे राहतील.अनेक जणांना लॉकडाऊन बद्दल विचारले असता त्यांना लोकडाऊन नको असून त्यांना सरकार कडून मदत मिळण्याचे आवाहन केले आहे.सरकार काय निर्णय घेणार ह्यावर बऱ्याच जणांचे भवितव्य अवलंबून आहे.कोरोना चा फैलाव ज्या पद्धतीने होत आहे ते पाहता कडक निर्बंध लागणे गरजेचे आहे,कोरोनाचा आकडा एकीकडे वेगाने वाढत असताना लोकांच्या बरे होण्याचे प्रमाण ही सुखावह आहे.लोकांनीही आपापली जवाबदारी स्वीकारून कारण नसताना गर्दी न करणे,मास्क वापरले आणि ठरवून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले तरच आपण ह्या कोरोना रुपी राक्षसाचा अंत करू शकतो.