लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे जिल्हा अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत समीर भागवत याने दुहेरी मुकुट पटकाविताना पुरूषांच्या ३५ वर्षे वयोगटात एकेरी तसेच दुहेरी प्रकारात विजेतेपदाला गवसणी घातली. पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) मॉडर्न क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. दुहेरीच्या अंतिम फेरीत समीर भागवत आणि अमित सानप या अव्वल मानांकित जोडीने हर्षवधन दामले आणि जगजीत खंडागळे यांच्यावर २१-१७, २१-१६ अशा फरकाने मात केली. तत्पूर्वी एकेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित समीरने दुसऱ्या मानांकित दिगंत गुप्ता याला २१-९, २१-१७ने नमविले होते. १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरी प्रकारात अव्वल मानांकित जान्हवी कानिटकर विजेती ठरली. अंतिम फेरीत तिने दुसऱ्या मानांकित अनन्या फडके हिचे आव्हान २२-२०, २१-१३ अशा फरकाने संपविले.
समीर भागवतला दुहेरी मुकुट
By admin | Published: June 28, 2017 4:24 AM