शिक्रापूर: श्री भैरवनाथ स्पोर्ट क्लब पाबळ आयोजित शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा प्रीमियर लीग २०२१ चषक सणसवाडी फायटर संघाने जिंकत ५० हजारांचे पारितोषिक मिळवले. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत २० संघांनी भाग घेतला.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पांडुरंग लोखंडे ,विजय चौधरी, गबाजी हरिभाऊ शिंदे , प्रकाश किसन जाधव ,संतोष नामदेव मोरे, मारुती शेळके, भगवान घोडेकर ,सोपानराव जाधव, संतोष पिंगळे ,योगेशभाऊ चौधरी, राजेंद्र गायकवाड,यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. स्पर्धेचे समालोचन मनोज बेल्हेकर, अमर साठे, कृष्णा यांनी केले. कुणाल खोंड, संदीप चौधरी व पाबळ येथील क्रिकेट खेळाडूंनी स्पर्धा यशस्वी पार पाडली.
अंतिम सामन्यात
मॅन ऑफ द मॅचचा किताब रामदास हरगुडे यांना देण्यात आला. बेस्ट क्षेत्ररक्षक म्हणून रवी कुमार साहू (भांबुर्डे) , चौकार हॅट् ट्रिक प्रसाद भंडारी (सणसवाडी), षटकार हॅट् ट्रिक गणेश भोंगळे (धामारी), विकेट हॅट् ट्रिक तुषार डफळ (धामारी), संघातील खेळाडूना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर बेस्ट बॉलरचा किताब दादा पवार (जातेगाव), बेस्ट बॅट्समन कुणाल खोंड (पाबळ संघ) ,तर मॅन ऑफ द सिरीजचा किताब जातेगाव संघातील नीलेश इंगवले या खेळाडूनी मिळवत सायकल बक्षीस देण्यात आली. शिस्तबद्ध संघ म्हणून निमगाव दुडे या संघाला किताब मिळाला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सणसवाडी फायटर संघ सणसवाडी या संघाला ५१ हजार रुपये व चषक, दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक शिवशंभो वाॅरियर्स जातेगाव संघ यांना ४१ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मळगंगा इलेव्हन भांबुर्डे या संघाला ३१ हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, सुभाष उमाप, दादा जांभळकर, संजूमामा चौधरी,सचिन वाबळे ,पांडुरंग लोंखडे, यांच्या हस्ते करण्यात आले.
१८ शिक्रापूर
पाबळ येथे आयोजित पीपीएल स्पर्धेत सणसवाडी फायटर विजेता संघ