शिक्रापूर: धामारी (ता. शिरूर) येथे आयोजित
केलेल्या 'खंडेराय करंडक' फुल पिच क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सणसवाडी फाइटर्स संघाने मळगंगा इलेव्हन भांबर्डे संघाचा पराभव करत प्रथम क्रमांक मिळवला.
दरम्यान, स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करणाऱ्या कुणाल खोंडला मालिकावीर किताबाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे स्पर्धेच्या माध्यमातून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश देत प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आंब्याचे झाड भेट म्हणून देण्यात आले. तालुक्यातील २० संघांनी सहभाग नोंदवला. सणसवाडी फाइटर्स संघाला युवा नेते अक्षय आढळराव पाटील यांच्या हस्ते ७१ हजार रुपये राेख रक्कम व मानाचा चषक देण्यात आला. या वेळी माजी सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, विकास गायकवाड, अमोल जगताप, संतोष बारणे, राहुल भुजबळ, हेमंत वाजे, सचिन पलांडे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी सुक्रे, ग्रामपंचायत सदस्य बापूदादा पऱ्हाड, सागर पलांडे, एकनाथ डफळ, नितीन डफळ, राहुल डफळ, शिवराम वाघोले, नवनाथ डफळ, गणेश डफळ, धनंजय डफळ, कैलास डफळ, रमेश गायकवाड, शरद डफळ, रमेश पलांडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत पंच म्हणून अमर साठे, अनमोल पवार, गुणलेखक म्हणून शुभम गावडे, तर नवनाथ साबळे व दत्ता पवार यांंनी काम केले. तर गणेश भोंगळे, सचिन चव्हाण, राहुल दफळ आदींसह खंडेराया स्पोर्ट्स क्लबच्या कार्यकर्त्यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक : सणसवाडी फाइटर्स, सणसवाडी.
द्वितीय क्रमांक : मळगंगा फायटर्स, भांबर्डे.
तृतीय क्रमांक : भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब, पाब
ळ.
चतुर्थ क्रमांक : नवचैतन्य फायटर्स, अण्णापूर.
०४ शिक्रापूर
सणसवाडी फाइटर्स संघाला प्रथम क्रमांचा चषक देताना मान्यवर.