शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

बृहन् बारामती पाणी योजनेला मंजुरी, ४० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:34 AM

निधीअभावी रखडलेली बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे.

बारामती - निधीअभावी रखडलेली बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.बारामती नगरपालिकेने बृहन् बारामती पाणीपुरवठा योजना आखली होती. सुरुवातीला अंदाजपत्रकानुसार या योजनेचा खर्च १९७ कोटी रुपयांवर जात होता. २००५मध्ये या योजनेला तत्कालीन राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली होती; मात्र त्यानंतर ही योजना १२९ कोटी रुपयांवर आणण्यात आली. राज्य शासनाच्या महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या योजनेचा एक टप्पा करण्याऐवजी तीन टप्प्यांमध्ये ही योजना राबवावी, अशी सूचना राज्य शासनाने केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यासाठी ४० कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामाला शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती नगरपालिकेने या संबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेतला आहे.या योजनेचे काम झाल्यास महादेवमळा, हिंगणेवस्ती, अवचट इस्टेट, पाटस रोड, खंडोबानगर, सिकंदर नगर, मोरगाव रोड, जामदार रोड, नीरा रोड, माळेगाव कॉलनी, फलटण रोड, समर्थनगर, देवळे इस्टेट, हरिकृपानगर, मोतीबाग ओढा रोड, सूर्यनगरी, जळोची, श्रीरामनगर, वडुजकर इस्टेट, दूध संघ सोसायटी, अंबिकानगर, देसाई इस्टेट आदी भागात पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.नवे जलशुद्धीकरण केंद होणारबारामती शहरातील अस्तित्वातील संगणीकृत जलशुद्धीकरण केंद्राशेजारी व जळोची येथील २२२ दशलक्ष लिटर साठवण तलावाशेजारील जागेत नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, या जलशुद्धीकरण केंद्रासाठी, तसेच ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव ते अस्तित्वाखाली सायली हील येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी उचलणे, अहिल्यादेवी गार्डन, ग्रामीण (नीरा रस्ता), स्वीमिंग पूल, भीमनगर, नवज्योत महिला सोसायटी, तांदुळवाडी (कल्याणीनगर), पाटबंधारे वसाहत या भागांसाठी उंच टाक्या उभारणे, नवीन टाक्यांसाठी, तसेच सध्याच्या टाक्यांचा विचार करून शुद्ध पाणी दाबनलिका बसविणे, वितरणनलिका टाकणे, २२२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या साठवण तलावाच्या दुरुस्तीसाठी जिओ मेम्ब्रेन करणे आदी कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या