दौंड : येथील भीमा नदीपात्रतील ब्रिटिशकालीन रेल्वेपुलाला बेकायदेशीर वाळूउपशामुळे धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या संरक्षणासाठी शासनाने योग्य ती पावले उचलणो गरजेचे आहे.
हा पूल साधारणत: दीडशे वर्षापूर्वीचा आहे. दिल्लीकडे जाण्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. वाळू माफियांनी या पुलाच्या खांबाजवळ मोठय़ा प्रमाणात वाळूउपसा केला आहे. त्यामुळे खांब कमकुवत होत चालले आहेत. पुलावरून रेल्वे जाताना हादरेही बसतात.
पुलाखाली तसेच परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाळूउपसा केला जातो; मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. पुलाला 22 मो:या असून, सर्वच मो:यांजवळ खांबाच्या भोवती उपसा होत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या लाईटच्या प्रकाशात वाळू काढली जाते. या पुलाच्या सुरक्षिततेबाबत रेल्वेचे अधिकारी मात्र बोलायला तयार नाहीत.
या संदर्भात रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक अजित माने म्हणाले, की पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल, शहर पोलीस, रेल्वे पोलीस आणि तहसीलदार या सर्वाचीच आहे. तरीदेखील भविष्यात सुरक्षिततेसाठी योग्य ती दखल घेतली जाईल. (वार्ताहर)
केव्हाही छापा टाकू : तहसीलदार
या संदर्भात तहसीलदार उत्तम दिघे म्हणाले, की या रेल्वेपुलाच्या परिसरात वाळूउपसा करणा:यांवर यापूर्वीही कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत येथील बेकायदेशीर वाळूउपसा कमी झाला आहे; परंतु रेल्वे प्रवासी आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून छापा घालून उपसा करणा:यांवर कडक कारवाई केली जाईल.
4गोदापात्रत अवैधरीत्या वाळू उपशाचा फटका 8 नोव्हेंबर 2क्14 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील पुलाला बसला होता़ जायकवाडी धरणातून दोन बंधा:यांसाठी पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड तालुक्यातील कुरणपिं्रपी या गावांना जोडणारा पूल अचानक खचला़ थोडय़ाच वेळात पुलाला जागोजागी तडे गेल़े त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला होता़
4बेसुमार वाळू उपशामुळे दौंडचा हा रेल्वेपूल कमकुवत झाला, तर दक्षिणोकडे जाणारी संपूर्ण वाहतूक कोलमडून पडू शकत़े रेल्वे प्रशासन व महसूल प्रशासनाने औरंगाबादचा धडा घेऊन तातडीने रेल्वे पुलाजवळील वाळू उपासा बंद करण्याची आवश्यकता आह़े