लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकदारांना चांगलाच दणका दिला आहे. एकाच दिवसांत केलेल्या धडक कारवाईत ३ लाख ३७ हजार १२० रुपयांचा दंडात्मक महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
हवेलीच्या पूर्व भागात महसूल पथकाने महसुली वसुलीचे ध्येय ठेवून कारवाई केली आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आणि हवेली उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महसूल पथकामध्ये स्वत: अप्पर तहसीलदार चोबे सहभागी झाल्याने महसूल पथकाचे मनोधैर्य वाढल्याचे दिसून आले. या पथकामध्ये मंडलाधिकारी किशोर शिंगोटे
पवन शिवले, सचिन मोरे, पी. टी. डुंबरे, बाळासाहेब लागे, गणेश सासर, अशोक शिंदे हे सहभागी झाले होते. आजच्या पूर्व हवेलीतील धडक कारवाईमुळे स्वामित्व धन थकीत क्रशर मशिन्स यांवर सक्त कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत अपर हवेली तहसीलदार चोबे यांनी दिल्याने अवैध गौणखनिज व्यावसायिकांनी धसका घेतला आहे.
फोटो: पूर्व हवेलीत कारवाई करताना महसूल पथक.