पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर शहराला लाभलेले पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची शुक्रवारी (दि. २०) बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संदीप बिष्णोई यांची वर्णी लागली आहे. पिंपरी-चिंचवडचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून बिष्णोई जबाबदारी सांभाळणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच औद्योगिक पट्ट्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार गेल्या वर्षी शासनाकडून त्यास मंजुरी मिळून १५ आॅगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पहिले पोलीस आयुक्त म्हणून पद्मनाभन यांची वर्णी लागली. राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार पद्मनाभन यांची बदली झाली आहे. मुंबई येथील वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक संदीप बिष्णोई यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पद्मनाभन यांची बदली झाली असली, तरी त्यांच्या पदस्थापनेबाबतचा आदेश वेगळ्याने निर्गमित करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली, संदीप बिष्णोई नवे आयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 2:51 PM
पिंपरी-चिंचवड शहराला लाभलेले पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची बदली
ठळक मुद्देगृह विभागाचा आदेश : पिंपरी-चिंचवडचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून बिष्णोई जबाबदारी सांभाळणार