वेल्हे तालुक्यातील अतिशय चुरशीची निवडणूक झाली असून केवळ एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. वेल्हे ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या नऊ असून आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. विजया गोरक्षनाथ भुरुक, आरती कैलास गाडे, सुनिल नामदेव कोळपे, पुष्पा गणेश गायकवाड,
सीता नंदकुमार खुळे, उज्ज्वला रवींद्र पवार, मेघराज दत्तात्रय सोनवणे, निखिल चंद्रकांत गायकवाड आदी सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ
एका जागेसाठी निवडणूक झाली. वेल्हे पंचायत समितीच्या माजी सभापती चतुरा नगिने यांचे सुपुत्र व राजगड कारखान्याचे संचालक संदीप नगिने यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवुन विजयी झाले होते. सरपंच पदाच्या निवडीसाठी मोठी चर्चा तालुक्यात रंगली होती. या सरपंचपदाच्या निवडणुकीत संदीप नगिने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची सरपंचपदी निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदासाठी उज्ज्वला पवार व सुनील कोळपे यांचे
दोन अर्ज दाखल झाले होते. परंतु शेवटच्या पाच मिनिटांत सुनील कोळपे यांनी माघार घेतल्याने उपसरपंचपदी उज्ज्वला पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र लुणावत व ग्रामसेवक नितीन ढुके यांनी जाहीर केले. यावेळी माजी उपसभापती प्रकाश पवार, राजगडच्या संचालिका शोभाताई
जाधव, माजी सरपंच संतोष मोरे, सुनिल भुरुक, खंडु गायकवाड, गणपत देवगिरीकर, शरद जाधव, संजय पवार, अनिल पवार, रमेश बोरकर आदी उपस्थित होते.
फोटो: मेंगाई मंदिर वेल्हे (ता. वेल्हे) सरपंचपदी संदीप नगिने व उपसरपंचपदी उज्ज्वला पवार यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना.