शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

दोन्ही समाजांनी बंधूभाव जपावा - संदीप पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 2:30 AM

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.

कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सामाजिक सलोखा बिघडवून गावातील वातावरण जाणिवपूर्वक दूषित करण्याचा बाहेरची शक्ती प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे येथील विस्कटलेली सामाजिक वीण पुन्हा जपण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये परस्परसंवाद आवश्यक आहे. दोन्ही घटकांनी सकारात्मक भूमिका घेत बंधूभाव जपण्याचे आवाहन पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी केले.येथे पखाले यांच्या उपस्थितीत शांतता बैठक घेण्यात आली होती. या वेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, ‘घोडगंगा’चे माजी संचालक कैलासराव सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, सरपंच संगीता गव्हाणे, उपसरपंच वृषाली गव्हाणे, केशव फडतरे, ज्ञानेश्वर शिंदे, जितेंद्र गव्हाणे, योगेश गव्हाणे, सुरेंद्र भांडवलकर, संपत गव्हाणे, काँग्रेसचे दिलीपराव सकट, राजेंद्र गवदे, बाळासाहेब भालेराव, वसंत सकट, सचिन कडलक, संतोष शिंदे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीनंतर मृत पूजा सकट हीस आदरांजली वाहण्यात आली.पोलीस निरीक्षक संदीप गिरीगोसावी यांनी सांगितले, की सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरवीत असल्याने दोन समाजांत तेढ मिटण्यास अडसर येत आहे. यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. शक्य तो सोशल मीडियावर आपण आपलाच प्रतिबंध घालावा. विघ्नसंतोषी लोकांची माहिती पोलिसांना दिली तर पुढील अनर्थ टळण्यास मदत होईल.कैलासराव सोनवणे व अनिल काशीद यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा तालुक्याला दिशा देणारे गाव असून गावात सामाजिक सलोखा आहे.गावातील वातावरण बिघडू नये, यासाठी जाणिवपूर्वक सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. तर संगीता कांबळे, वृषाली गव्हाणे व जितेंद्र गव्हाणे यांनी सर्व बेघर दलित बांधवांना घरे बांधून देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असल्याचे सांगितले.या वेळी मृत पूजा सकट यांचे चुलते वसंतराव सकट यांनी सांगितले, की परिसरात जातीय सलोखा जपण्याचा आमचा आग्रह आहे. समाजात विष पेरणाऱ्यांना शोधले तरच परिसरात शांतता नांदू शकेल. अहमदनगर काँग्रेसचे दिलीप सकट यांनी अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेस तपासून घेण्याबाबत आम्ही नगर जिल्ह्यात आग्रही भूमिका घेतली असून या ठिकाणी दोन्ही समाजाने सलोखा राखण्याचे आवाहन केले, तर राजेंद्र गवदे यांनी परिसरातील कोणत्याही घटनेचा संबंध कोरेगाव दंगलीशी जोडू नये, असे आवाहन पोलिसांना केले.कोरेगाव भीमा दंगलीची दाहकता चार महिन्यांनंतरही कायम आहे. सोशल मीडियावर मेसेज पाठविताना काळजी घेण्याचे आवाहन करतानाच दोन समाजांमध्ये अविश्वासाची उभी राहिलेली भिंत बाजूला करण्यासाठीही पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.- डॉ. संदीप पखाले, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेnewsबातम्या