एकलहरे येथील प्राथमिक शाळेत सानेगुरुजी यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शामराव कराळे बोलत होते. अध्यक्षस्थानी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे होते. यावेळी कथामाला सल्लागार संजय डुंबरे,उपाध्यक्ष बाळासाहेब घोडे,कार्याध्यक्ष राजेश कांबळे, वैशाली गाढवे,केंद्रप्रमुख गजानन पुरी,साहेबराव शिंदे, शैलेंद्र चिखले,मुख्याध्यापक शाम धुमाळ,संजय शिर्के,अंबादास वामन,मंगेश मेहेर,रवींद्र वाजगे उपस्थित होते.
कथामाला आजीव शाखांतील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आलेली तृप्ती थोरात, संस्कृती जरे, आर्या कुंजीर(सहावी), अनुष्का थोरात (नववी), सानिका थोरात व राजनंदिनी भोर (दहावी) तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आठवा आलेला सिद्धेश पुंडे यांना यावेळी गौरविण्यात आले. सानेगुरुजी जयंतीचे निमित्ताने नवीन आजीव अकरा कथामाला शाखा स्थापन झालेल्या शाळांतील गुरुजनांना तसेच आजीव शाखांतील यशस्वी शिष्यवृत्तीधारक मार्गदर्शक शिक्षक नंदिनी पडवळ, संदीप शिंदे, मुख्याध्यापक विलास डोळस यांचा सन्मान करण्यात आला. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीवर केंद्रप्रमुख विजय सुरकुले, सुनीता वामन,मधुकर गिलबिले यांची नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कथामाला राज्य प्रतिनिधी मनिषाताई कानडे, साधना शिर्के, जयश्री गडगे, विकास कानडे, संतोष थोरात, अनिल गावडे, संतोष गवारी, अमृता कानडे, संतोष कानडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक कोषाध्यक्ष संतोष गडगे, सूत्रसंचालन कार्यवाह चांगदेव पडवळ व आभार बबन सानप यांनी मानले.
--
२५ मंचर सानेगुरुजी कथामाला
छायाचित्र मजकूर : एकलहरे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना शालेय विद्यार्थी व कथामाला कार्यकर्ते.