बारामती: बारामती शहरातील कोरोनाच्या संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधक प्रक्रियेतपोलीसांसह शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठा आहे. या पार्श्वभुमीवर जीवधोक्यात घालुन काम करत असणाऱ्या शासनाच्या सर्व कर्मचायांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सॅनिटायझेशन बस सेवा देऊ केली आहे. बुधवारी(दि.१५)राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तयार केलेली सॅनिटायझेशन व्हॅन बारामती आगाराने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सुपूर्त केली. विभाग नियंत्रक यामिनी जोशी पुणे यांनी सांगितले,बारामती शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सॅनिटायझेशन व्हॅन तयार केली आहे. ती व्हॅन बारामती उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांना सोपवण्यात आली आहे. या सॅनिटायझर व्हॅनवर एसटी महामंडळाचे कामगार चालक म्हणुन काम पाहणार आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर व त्यांचा स्टाफ,पोलीस प्रशासन,नगर पालिका प्रशासन,प्रांत कार्यालय,तहसील कार्यालय व सरकारी कर्मचारी यांना त्याची सेवा बजावताना किंवा घरी जाताना खबरदारी म्हणुन सॅनिटायझेशन बसच्या आतमध्ये असणाऱ्या शॉवरमधून कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांमुळे घरी कुटुंबासाठी कोरोना संसगार्चा धोका निर्माण होणार नाही. बसमध्ये ४०० लिटर पाण्यामध्ये सोडिअम हायड्रो क्लोराईड हे निर्जंंतुकीकरण करणारे औषध वापरले जाणार आहे.त्यासाठी डी.सी करंटवरकार्यान्वित होणारी बारा व्होल्टची मोटार जोडण्यात आली आहे. व्हॅनमधुन जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर फवारणी होणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचे पूर्णपणे निर्जंंतुकीकरण होऊन तो आपल्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊ शकतो , असे बारामती आगर प्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले .यावेळी पुणे विभाग नियंत्रक यामिनी जोशी,यंत्र अभियंता अशोक सोट पुणे,विभागीय वाहतूक अधिकारी दिपक घोडे,आगर प्रमुख अमोल गोंजारी,वाहतूक यंत्र अभियंता पांडुरंग वाघमोडे यावेळी उपस्थित होते.
बारामती परिवहन महामंडळाकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझेशन बस सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 6:20 PM
बारामती शहरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली सॅनिटायझेशन व्हॅन तयार
ठळक मुद्देबारामती शहरातील कोरोनाच्या संसर्गाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासन सतर्क सॅनिटायझर व्हॅनवर एसटी महामंडळाचे कामगार चालक म्हणुन काम पाहणार