पुणे :सध्या कोरोनामुळे तसेच त्या पासून संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझर आणि सार्वजनिक स्वच्छता महत्वाची आहे. ही गरज लक्षात घेऊन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ)च्या दिल्ली येथील सेंटर फॉर फायर एक्सपलोझिव्ह अॅण्ड एनव्हायरमेंट सेफ्टी या प्रयोग शाळेच्या माध्यमातून दोन सॅनिटायझर गॅससीलेंडर तयार करण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी ज्यापद्धतीने इमारतीत अग्नीशामक सिलेंडर असतो, तसेच हे सॅनीटायझर सिलेंडर असून जवळपास ३०० मिटरचा परिसराचे निर्जंतूकीकरण या उपकरणाद्वारे करता येणार आहे.
‘मेक इन इंडिया'च्या उपक्रमा अंतर्गत सार्वजनिक जागेच्या निजंर्तुकीरणसाठी सॅनिटायझर सिलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या आरोग्य विभाग आणि प्रशासनाला याची गरज होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेत फवारणी करण्याकरिता सहजरित्या याला उचलून घेऊन जाण्यासाठी ट्रॉलीही डीआरडीओने तयार केली आहे. या सॅनिटायझर सिलिंडरच्या माध्यमातून 'हायपोक्लोराईड'ची फवारणी केली जाते. सुमारे ३०० मीटर पर्यंतचा परिसर निजंर्तुकरण करण्यासाठी हवा आणि रासायनिक द्रवाचा वापर करुन फवारणी करण्यात येते. यामध्ये रुग्णालयाचे स्वागतकक्ष, डॉक्टरांची केबीन, कार्यालये, मेट्रो, रेल्वे स्थानक, बस स्थानक आदी जागांवर याचा वापर करता येणे शक्य आहे. यामुळे हा परिसर स्वच्छ करता येणे शक्य झाले आहे. ‘मेक इन इंडिया'च्या उपक्रमा अंतर्गत या सॅनिटायझर सिलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे.
ट्रॉलीची सोय असल्याने सॅनिटायझर सिलेंडर तीन हजार मीटर पर्यंत वापरता येऊ शकतो. या सिलेंडरची द्राव्य क्षमता ५० लीटर आहे. १२ ते १५ मीटर पर्यंत फवारणी करता येऊ शकते. या सॅनिटायझर सिलिंडरचा वापर सध्या दिल्ली पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणांवर करण्यात येत आहे. हे सिलिंडर देशातील विविध संस्थांना, रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी संस्थेने व रुग्णालयांनी डीआरडीओशी संपर्क साधावा, असे आवाहन डीआरडीओच्या वैज्ञानिकाने केली आहे.