गराडे : भिवरी ग्रामपंचयातीची निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध झाली. सरपंच व उपसरपंचांच्या निवडीही बिनविरोध झाल्या. सरपंचपदी संजय दिनकर कटके तर उपसरपंचपदी प्रणोती रामहरी कटके यांची निवड करण्यात आली.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून वाय. एस. काटकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे, तलाठी गणपत खोत यांनी निवडणूकीचे प्रशासकीय कामकाज पाहिले.
बिनविरोध निवडीनंतर भैरवनाथ मंदिरात सरपंच, उपसरपंच व बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा संपूर्ण गावाने मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला.
यावेळी भिवरी गावचे सर्व पक्षीय, संघटना, संस्थांचे मान्यवर पदाधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य दिलीप सदाशिव कटके, मारुती भैरु कटके,
हरिदास वामन गायकवाड, मंगला दादासाहेब घाटे, शेखर दत्तात्रय पिसे, सरिता हनुमंत गोरड, कौशल्या पोपट दळवी, साधना रामदास ताम्हाणे, यशोदा प्रकाश कटके उपस्थित होते.
सुत्रसंचालन नाथाभाऊ कटके व माऊली घारे यांनी केले.
फोटोओळी: येथील भैरवनाथ मंदिरासमोर सरपंच संजय कटके व उपसरपंच प्रणोती कटके यांच्या निवडप्रसंगी मान्यवर ग्रामस्थ.