पुणे : शिवसेना खासदार संजय राऊतपुणे दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी गेले आहेत. त्यावरूनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष नेत्यांकडून तर्क - वितर्क लावले जात आहेत. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात शिवसैनिकांच्या आढावा बैठकीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राऊत म्हणाले, देशाने शिवसेनेचे ताकद पाहिली आहे. गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. तुमच्या नेत्यांसोबत आज जेवायला होते तुम्ही कुठे होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मला विचारलं उद्धव ठाकरे दिल्लीला गेले. मी म्हटलं आमची सत्ता येणार म्हणून गेले असही राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे. तर पुण्यात कधी येणार आपली सत्ता? असा प्रश्नही त्यांनी शिवसैनिकांना विचारला आहे.
''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून देशातील पहिल्या पाच मध्ये आले. विरोधीपक्ष म्हणायच यांना काय येत, पण आता पाहतोय आपण. मला राहुल गांधी यांनी विचारलं शिवसेनेच्या यशाचा रहस्य काय तर म्हटलं, आमची भाषा टीका नाही, तुम्हाला पण नेता होण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, आम्ही कधीही मागे हटत नाही, फटे लेकिन हाटे नहीं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.''
''मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानं लोक देव पाण्यात घालून बसले आहेत. ते मुंबईत परत आले, अमित शहा ना पण भेटले, शासकीय काम करून परतले, पुढील तीन वर्षे पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील. असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केलाय.''