मुलाखतीच्या शेवटी एक रँपिड फायर राऊंड घेऊयात, ज्यात काही नावं सांगतो. त्यांच्याविषयी एक चांगला गुण सांगायचा आणि एक सल्ला द्यायचा असे सांगताच, झालं ना आता? असं राऊत म्हटले. जेवणानंतर ‘स्वीट डिश’ हवी ना? असं प्रत्युत्तर अतुल कुलकर्णी यांनी देताच सभागृहात हशा पिकला. त्यावर ‘मी स्वीट खात नाही,’ लोक मला मिरच्या आणि कारलीच खायला घालतात, असं मार्मिक उत्तर राऊत यांनी दिले.नरेंद्र मोदीमोदी हे प्रचंड मेहनती आहेत. त्यांच्याइतकी मेहनत कुणीच घेणार नाही. त्यांना मी काय सल्ला देणार? त्यांना सल्ला द्यायचा अधिकार मला नाही. फक्त पत्रकार या नात्याने सांगू इच्छितो, की आसपासच्या आपल्या सहकाऱ्यांकडेही लक्ष द्यायला पाहिजे.अमित शहाप्रखर राष्ट्रभक्त आहेत. त्यांनी जे काही निर्णय घेतले उदा : कलम ३७० असो ते कौतुकास्पद आहे. ते खूप हिमतीचे आहेत. पण देशात लोकशाही आहे हे त्यांनी मान्य केले पाहिजे. अनेक विषयांत विरोधी पक्षाचे मत समजूनघेतले पाहिजे.नितीन गडकरीगडकरी यांनी दिल्लीत जास्त लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. ते नागपूरमध्येच बसून भाषण करतात. त्यांची गरज दिल्लीत जास्त आहे. कुणीतरी महाराष्ट्राच्या नेत्याने दिल्लीत ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.अॅड. बाळासाहेब आंबेडकरबाळासाहेबांशी माझे खूप चांगले संबंध आहेत. पण भाजपला मदत होईल असं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये.राहुल गांधीते मनाने खूप चांगले आणि निष्कपट आहेत. पण किमान १५ तास त्यांनी पक्ष कार्यालयात बसणं गरजेचं आहे.असदुद्दीन ओवीसीउत्तम कायदेपंडित आहेत. त्यांची भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. लोक सहमतदेखील होतात. पण जे आंबेडकर यांच्यासंदर्भात म्हणालो तसे त्यांनीही व्होटकटर मशिनची भूमिका बदलायला पाहिजे.अजित पवारहे सध्याच्या मंत्रिमंडळातले अत्यंत कार्यक्षम मंत्री आहेत. कामाला वाघ असा मंत्री बघितला नाही. निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता आणि हिमतीने काम करणारा माणूस आहे. अजित पवारचे तोंड खराब आहे, असे तेही म्हणतात. पण राजकारणात अशा तोंडाची गरज आहे, माझा त्यांना सल्ला आहे की असेच ठेवा.राज ठाकरेराज ठाकरे कलावंत माणूस आहे. उत्तम व्यंगचित्रकार आहेत. नेतेसुद्धा आहेत. देशात आणि महाराष्ट्रात ही कला लोप पावत आहे. राज ठाकरे यांनी ब्रश घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फटकारे मारले पाहिजेत.उद्धव ठाकरेअनेक वर्षे जवळून पाहत आहेत. ते निष्कपट आहेत. आता मुख्यमंत्री या नात्याने काही कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
नरेंद्र मोदींपासून अजितदादा अन् राज ठाकरेंना संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला, म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 3:28 AM