याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, करंजविहीरे येथे महावितरणचे ३३/११ केव्ही केंद्रा आहे. २८ मार्च रोजी रात्री सव्वाअकरा वाजता करंजविहीरे बाजूकडून शिवे गावाकडे जाणाऱ्याकडे जाणाऱ्या दोघांनी उपकेंद्राच्या आवारात येऊन कार्यालयाचा दरवाजा लावून कार्यालयावर दगडफेक केली. त्यामध्ये कार्यालयाच्या खिडक्यांचा काचा फुटल्या. याबाबत करंजविहीरे उपकेंद्रांमध्ये कामावर असलेले सुजीत नेहरे यांना काही क्षण हा काय प्रकार चालू आहे हे समजले नाही. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून दरवाजा लावला असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. घडलेला प्रकार कनिष्ठ अभियंता विजय कांबळे यांना मोबाईलवरून कळविला. त्यानंतर पाईट पोलीस चौकी येथे कनिष्ठ अभियंते आर कांबळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------------------
फोटो २९पाईट वीजवितरण केंद्र
फोटो क्रमांक : करंजविहीरे ता खेड येथे दोन अज्ञात इसमांनी दगडफेक करुन नुकसान केलेली उपकेंद्राची इमारत.