शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

संजीव पुनाळेकर यांना कोठडी द्यावी - सीबीआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 3:55 AM

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची न्यायालयाकडे मागणी

पुणे : अ‍ॅड़ संजीव पुनाळेकर यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने त्यांच्याकडे चौकशीकरिता पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने न्यायालयाकडे केली आहे.विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सध्या अ‍ॅड़ पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अ‍ॅड़ पुनाळेकर आणि लिपिक विक्रम भावे यांना सीबीआयने गेल्या महिन्यात अटक केली आहे. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले की, अ‍ॅड़ पुनाळेकर यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह असा इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला आहे. पुनाळेकरांच्या मोबाईलमधील डेटाचे विश्लेषण केले असता सीबीआयला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून, त्यादृष्टीने त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. त्यामुळे अ‍ॅड. पुनाळेकर यांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने या प्रकरणी गुरुवारी सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले असून, त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होईल असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर