शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नळपाणी पुरवठा योजनांना संजीवनी

By admin | Published: April 23, 2017 4:14 AM

जिल्ह्यातील ५२ गावांच्या नळपाणी पुरवठा दुरुस्ती रखडली होती. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. जिल्हा परिषदेने नुकतेच यासाठी

पुणे : जिल्ह्यातील ५२ गावांच्या नळपाणी पुरवठा दुरुस्ती रखडली होती. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत होती. जिल्हा परिषदेने नुकतेच यासाठी ३ कोटी ७८ लाख ३२ हजार १५३ रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई काळात नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जुन्या नळपाणी पुरवठा योजनांना संजीवनी मिळणार आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टंचाई आढावा बैठक बोलविली होती. या वेळी जिल्हा परिषद सदस्यांनी मागणी तसे टँकरचा पुरवठा सुरू करा, बंद नळपाणीपुरवठा योजना सुरू कराव्यात, अशा विविध मागण्या केल्या होत्या. टंचाई कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ५२ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्तीची कामे मंजूर झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी दिली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यातच नळपाणीपुरवठा करणाऱ्या योजना नादुरुस्त होत्या. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी परवड होत होती. नळपाणीपुरवठा करणाऱ्या योजना नादुरूस्त असल्याने काही योजना बंद होत्या, तर काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते.जिल्हा परिषद सदस्यांनी पाणीटंचाईच्या आढावा बैठकीमध्ये टँकर सुरू करण्याचे अधिकारी तहसीलदारांना देण्यात यावे. टंचाईग्रस्त गावामध्ये हातपंपाची दुरुस्ती प्राधान्याने करावी, नव्याने विंधन विहिरी बांधाव्यात आदी मागण्या केल्या होत्या. १२ विहिरींच्या दुरुस्तीसाठी सव्वातेरा लाख जिल्ह्यातील गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी निधी मंजूर केला आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १२ विहिरींच्या कामांसाठी १३ लाख २५ हजार २६५ रुपये मंजूर केले आहेत. यामधून बारामती तालुक्यातील गुणवडी, सत्यसाईनगर, कटफळ गावठाण, होळ गितेवस्ती, कोऱ्हाळे बु. माळशिकारेवस्ती, लाटे, बजरंगवाडी, सावळ, बालगुडेपट्टा, सदोबाचीवाडी, थोपडेवाडी, सावंतवाडी, नारोळी, कोऱ्हाळे बु. कोकणेवस्ती, सोनवडी, सुपे. तर पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी, पिंप्रा येथील विहिरींची कामे करण्यात येणार आहेत.तालुकानिहाय नळपाणी पुरवठा मंजूर योजनामावळ : लष्करवाडी, वडेश्वर, खामशेत, सुधवडी, उकसान पुनर्वसन, पवळेवाडी कल्हाट, काले, नाने, मिंडेवाडी, नवलाख उंब्रे, कुसुर, वळख मुडावरे, घोणशेत,मुळशी : कोंढुर, कोळावडे, मुठा, खारावडे, कुंभेरी. भोर : राजघर, गोकवडी, डेहण, कोंडगाव, साळुंगण.वेल्हा : सुरवड, देशमुखवाडी, वरसगाव, सौंडेसरपाले.बारामती : मगरवाडी, पवईमाळ, लाटे.इंदापुर : निरनिमगाव, कलठण नं. २, शिंदेवाडी.दौंड : सहजपूर, लडकतवाडी गावठाण.पुरंदर : दातेवाडी वाल्हा, गायकवाडवस्ती हरळी, भिसेबनकर वस्ती, दवणेवाडी, धनकवडी.खेड : मोरोशी,भलवडी, बहुल, साबळेवाडी. जुन्नर : कुरण, राळेगण, खउकुंबे जळवंडी, सोनावळे, दर्गावाडी नं. १, हातवीज, सुरळे, नामदेवाडी आंबे, पिंपरवाडी आंबे, चिल्हेवाडी, इंगळूण, दुर्गावाडी नं. २, हातवीज, पांगुर्णेवाडी हातवीज. तालुकानिहाय नळपाणीपुरवठा योजनांसाठी मंजूर निधी तालुकारक्कममावळ १२ लाख ७७ हजार ४०३३ रुपयेमुळशी३० लाख ६० हजार ६५४ रुपयेखेड३२ लक्ष ३७ हजार ३४० रूपयेभोर२१ लाख ३५ हजार ८१० रूपयेवेल्हा१७ लाख ५४ हजार ४३३ रूपयेबारामती१४ लाख ३२ हजार ८०० रूपयेइंदापूर८ लाख ६१ हजार ७४५ रूपयेदौंड ५ लाख १५ हजार ६०० रूपयेपुरंदर६२ लाख ३८ हजार ९१८ रूपयेजुन्नर५८ लाख १७ हजार ८२० रूपयेएकूण ३ कोटी ७८ लाख ३२ हजार १५३ रूपये