..................................
राग द्वेष, अहंकार यांनी हा संसार भरलेला आहे. आपल्यामधील अहंकार दूर करण्यासाठी आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. संपूर्ण वर्ष आपण कित्येक अहंकार मनात ठेवून जगत असतो. कित्येकांशी कित्येक वाद होतात. जाणते- अजाणतेपणी कित्येकांना दुखावतो. जीवनात रोज धावपळ करत असताना आपण कित्येक हिंसा करतो. या सर्वांची माफी मागण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस होय. जेव्हा आपण एखाद्याचे मन दुखावतो तेव्हा त्यांना खूप दु:ख, त्रास होत असतो. या सर्व गोष्टीसाठी आपण त्यांची माफी आज मागत असतो. त्या बरोबरच दुसऱ्याला माफ देखील करायला हवे. मनुष्य छोट्या-छोट्या गोष्टीसाठी मान- सन्मान यावर अडून बसत असतो. पण आज आपण आपले पद, प्रतिष्ठा आणि अहंकार सर्व बाजूला ठेवून आज सर्वांची क्षमा मागायला हवी. धर्माचा हात पकडून आपल्याला ईश्वराच्या जवळ जायचे आहे.
- उपप्रवर्तक तारकऋषिजी महाराजमहाराज (फोटो आहे)