शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

संत ज्ञानोबा - तुकोबांच्या पादुका पोहोचल्या लंडनला; विश्वभ्रमण दिंडीचे दुसरे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 1:44 PM

नोकरीनिमित्त विदेशात राहणाऱ्या भारतीयांना संतांच्या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्यांना वारकरी कीर्तन, भजनाचा आनंद मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश

भानुदास पऱ्हाड 

आळंदी : श्री संत ज्ञानोबा - तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे लंडन येथे भारतीय बांधवांनी मोठ्या भक्तीभावे स्वागत केले. विश्वभ्रमण दिंडीचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी श्री ज्ञानोबा तुकोबांच्या पादुकांसह स्वामी समर्थांच्या पादुकाही हरिनाम गजरात लंडनला नेण्यात आल्या आहेत.             नोकरीनिमित्त विदेशात राहणाऱ्या भारतीयांना संतांच्या पादुकांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे, त्यांना वारकरी कीर्तन, भजनाचा आनंद मिळावा यासाठी सदर दिंडीचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी पहिल्यांदा २०२२  मध्ये दुबईला विश्वभ्रमण दिंडी नेण्यात आली होती. त्यावेळी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. इतर देशांत राहणाऱ्या भारतीय भाविकांनी त्यांनाही संतांच्या पादुकांचे दर्शन व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्याने यावर्षी लंडनला दिंडीचे आयोजन केले आहे.           तत्पूर्वी तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात अभिषेक, मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. चलपादकांचे शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर, जेष्ठ सिने अभिनेता मोहन जोशी, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौड, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, देहू देवस्थान माजी अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे, डी. जी. पी. नरेंद्र निकम, ज्ञानेश्वर बोडके, डी. डी. भोसले, रामशेठ गावडे, विठ्ठल शिंदे आदींच्या हस्ते पूजन करून दिंडी लंडनकडे मार्गस्थ झाली.

लंडन येथे हेथ्रो विमान तळावर स्लॉव्ह मित्र मंडळ स्लॉव्ह साव्ह लंडन यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मंदार मिराशी, आनंद पंडित, देसाई साहेब, सागरजी खिंडारे व सागर कुलकर्णी यांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. लंडन येथे पादुकांना अभिषेक, पूजा व महाआरती करून संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीपती संतोष कुलकर्णी व श्रीमंत दादासाहेब करांडे व राहुल कराळे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीdehuदेहूsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामSocialसामाजिकLondonलंडन