शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

माऊली विठुरायाच्या भेटीला; आळंदीत वारकऱ्यांची लगबग, पोलीस - आरोग्य विभाग सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 3:37 PM

माऊलींचा वैभवशाली सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखीचे रविवारी (दि.११) सायंकाळी चारला तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान होणार आहे. माऊलींच्या वैभवशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. तत्पूर्वी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.

आळंदीत पालखी प्रस्थान सोहळयाच्या एक - दोन दिवस अगोदर असंख्य वारकरी येत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी नदीपलीकडील जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर पत्रे टाकले आहेत. या दर्शनबारीतून वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलमार्गे मंदिराकडे दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही दर्शनबारी उभारली आहे. त्याद्वारे भाविकांना माऊलींच्या समाधीचे सुलभ दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे.

दरम्यान आळंदीत दाखल झालेले भाविक ग्रंथ वाचण्यात दंग दिसून येत आहेत. सिध्दबेटमध्ये अजान वृक्षाखाली शीतल छायेत काही भाविक पारायण करत आहेत. आळंदीमधील तुळशी, हार, फुलांची, वारकरी साहित्य मृदुंग, वीणा, टाळ, पेटी, ग्रंथ साहित्य इ. विविध दुकाने सजली आहेत.

पाणीपुरवठा : वारकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने शहरात विकेंद्रित पद्धतीने ५ टँकर फिलिंग ठिकाणांची व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा व कर्मचारी २४ तास असावेत असे आदेश मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी निर्गमित केले आहेत. वारी काळात एकूण २२ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरात लावलेल्या शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाईप लाईन टाकून काम करून घेण्यात आले आहे.

विद्युत विभाग : शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरातील तसेच इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे एकूण १७ हायमास्ट दिवे चालु केले आहे. शहरातील मोबाईल टॉयलेट यांना विद्युत व्यवस्था करून देण्यात आली आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पुरवठा केंद्राच्या ठिकाणी २५० के.व्ही.ए क्षमतेचे जनरेटरची व्यवस्था पालिके मार्फत करण्यात आली आहे.

आरोग्य विभाग : आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण होणाऱ्या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी कामे तीन शिफ्टमध्ये करणेत येणार आहेत. नगरपरिषदेच्या १२ घंटागाड्या, ३ कॉम्पाक्टर, ५ टॅक्टर, सक्शन मशीन इत्यादी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी २४ तास तैनात असणार आहेत. वारी संपल्यानंतरच्या स्वच्छतेबाबतचे नियोजन देखील केले आहेत. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालय एकूण ३५६ सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सिट्ससह, १५०० मोबाईल टॉयलेट्स भाविकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच ते वापरण्या योग्य राहतील यासाठी पालिकेने तयारी केली आहे. शहरात संसर्गजन्य रोग पसरू नये या करीता शहरात नियमितपणे जंतू नाशक फवारनी व धुर फवारणी केली जात आहे.

वारीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून आळंदीतील प्रमुख चौक तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र, टेहळणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी - चिंचवड आयुक्तालयाकडून ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलिस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, १८२२ अंमलदार, ३३९ वाहतूक अंमलदार, १ हजार होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या ४ तुकड्या, बीडीडीएसचे ४ पथक, चोरी नियंत्रण १२ पथके, छेडछाडची २ पथके व दामिनी ४ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर पालिकेचेही १३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ मोठ्या स्क्रीन बसविण्यात आले असून पोलिस यंत्रणेस चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात याची मोठी मदत होणार आहे.   

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामPandharpurपंढरपूरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022