सोमेश्वरनगर : संतश्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज पालखीने सायंकाळी ४ वाजता बारामती तालुक्यामध्ये प्रवेश केला. निंबूत ग्रामस्थांनी पालखीच्या जोरदार स्वागतानंतर पालखी मुक्कामासाठी निंबूत गावामध्ये विसावली.पालखी मांडकी येथील मुक्काम उरकून मार्गस्थ झाली होती. जेऊरला सकाळच्या न्याहरीसाठी पालखी सोहळा काही वेळ विसावला. पिंपरे येथेही पालखी सोहळा विसावला. यानंतर हा सोहळा निरेकडे मार्गस्थ झाला. निरेतून दुपारचे जेवन उरकून मुक्कामासाठी आलेल्या पालखीचे निंबुत गावामध्ये जिल्हा परीषद सदस्य प्रमोद काकडे, सतिश काकडे, शहाजी काकडे, सविता काकडे, सरपंच राजकुमार बनसोडे, बारामतीचे नायब तहसिलदार, उपसरपंच उदय काकडे, मदन काकडे, पोलीस खाते, उर्जा खाते आदींनी पालखीचे स्वागत केले.रस्त्याच्या दुतर्फा रांगोळया काढल्या होत्या. बा. सा. काकडे विद्यालयातील मुलांनी झांजपथकाद्वारे जंगी स्वागत केले. सतिशभैय्या कल्याणकारी संघाच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांना केळीचे वाटप केले.आज पहिले अश्वरिंगणशुक्रवारी निंबूतचा मुक्काम उरकून पालखी सोमेश्वरनगरकडे मार्गस्थ होणार आहे. सकाळची न्याहारी निंबूत या ठिकणी होणार असूनदुपारचे जेवण वाघळवाडी या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सोपानकाका पालखी सोहळयातील पहीले अश्वरिंगण पार पडेल.
संत सोपानकाकांची पालखी बारामतीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:05 AM